आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शहरातील विविध शाळांच्या विद्यार्थ्यांचा शपथ घेऊन स्वच्छतेचा निर्धार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी रविवारी शपथ घेऊन स्वच्छतेचा निर्धार केला. महापालिका प्रशासनाने स्वच्छता निर्धार दिनानिमित्त शिवाजी महाराज पुतळा परिसरात स्वच्छता मोहीम राबवली. वाडिया पार्क येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ मोहिमेचा समारोप झाला.
महापालिकेच्या वतीने दर गुरूवारी शहराच्या विविध भागात स्वच्छता मोहीम राबवली जाते. नगरसेवक, पदाधिकारी सर्वच अधिकारी या मोहिमेत सहभागी होतात. रविवारी स्वच्छता निर्धार दिनाच्या पार्श्वभूमीवर माळीवाडा बसस्थानक परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. महापौर सुरेखा कदम, उपमहापौर श्रीपाद छिंदम, आयुक्त दिलीप गावडे, उपायुक्त भालचंद्र बेहेरे, प्रभाग अधिकारी जितेंद्र सारसर, स्वच्छतादूत सुरेश खामकर, आश्लेषा भांडारकर, अंजली देवकर यांच्यासह विद्यार्थी पालक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विविध शाळांनी एक दिवस अगोदरच स्वछता निर्धार दिन साजरा करण्याचे नियोजन केले होते. महापालिकेने या विद्यार्थ्यांना स्वच्छतेची शपथ दिली. महापौर कदम यांनी स्वच्छता मोहिमेत सहभागी होऊन साफसफाई केली. आयुक्त गावडे उपायुक्त बेहेरे यांनीदेखील स्वच्छतेचा निर्धार केला. सकाळी वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात स्वच्छता मोहिमेस सुरुवात झाली. माळीवाडा बसस्थानक परिसर, वाडिया पार्क, टिळक रस्ता आदी भागात स्वच्छता करण्यात आली. सकाळी दहा वाजता वाडिया पार्क येथील गांधी पुतळ्याजवळ मोहिमेचा समारोप झाला.

घरोघरी हवे स्वच्छतेला महत्त्व
शहरउपनगरांतील सर्व नागरिकांनी स्वच्छतेला महत्त्व देऊन आपला परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे. महापालिकेच्या स्वच्छता मोहिमेमुळे नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागृकता निर्माण होत आहे. विद्यार्थीदेखील या मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. स्वच्छतेचे महत्त्व प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे, असे यावेळी स्वच्छतादूतांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...