आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"जिवाशी'ने जपले ऐतिहासिक वास्तूचे पावित्र्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - "कचराकरणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे', असं काहींना वाटतं. स्वातंत्र्य दिनाची सुटी साजरी करणाऱ्यांनी शनिवारी चांदबिबी महाल परिसरात कचरा करून ठेवला. त्यामुळे या परिसराला अवकळा आली होती. मात्र, जिवाशी ट्रेकर्सने रविवारी तिथे जाऊन सगळा कचरा गोळा करून या ऐतिहासिक वास्तूचे पावित्र्य जपले.

शहरापासून सुमारे १२ किलोमीटर अंतरावर असलेला चांदबिबी महाल (सलाबतखान मकबरा) म्हणजे नगरची ओळख आहे. गर्भगिरी डोंगराचा हा परिसर पावसामुळे आल्हाददायक बनला आहे. केवळ नगरचेच नाही, तर राज्यभरातील पर्यटक हा महाल पाहण्यासाठी येतात. सुटीच्या दिवशी ही संख्या हजारात जाते. पंधरा ऑगस्टला तर पाच हजारांवर नागरिकांनी या महालाच्या परिसरात सुटी साजरी केली. पर्यटकांनी आणलेले खाद्यपदार्थांचे रॅपर, आइस्क्रीमचे कप, पिशव्या यांचा कचरा तिथे साचला होता. पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या या परिसरात एकही कचऱ्याचा डबा नाही. त्यामुळे बरेचसे नागरिक कचरा तसाच टाकून निघून गेले.

जिवाशी ट्रेकर्सचे डॉ. उमेश निंबाळकर त्यांच्या सहकाऱ्यांनी रविवारी सकाळी वाजताच महालावर जाऊन स्वच्छता मोहीम हाती घेतली. "जिवाशी'चे सदस्य आणि अन्य काही मंडळी अशा एकूण ३०० जणांनी अडीच तास श्रमदान करून परिसरातील सगळा कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावली. त्यामुळे वास्तू स्वच्छ झाली. जवळ जवळ २५० गोण्या कचऱ्याने भरल्या होत्या. या मोहिमेत सहभागी झालेल्या मंडळींना नंतर अल्पोपाहार देण्यात आला.