आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'सेल्फी'ऐवजी मोबाइलमधून निसर्गसौंदर्य टिपा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - हल्ली बरेच जण मोबाइलचा वापर 'सेल्फी'साठी करतात. त्याऐवजी निसर्गसौंदर्य टिपण्यासाठी मोबाइलचा उपयोग करायला हवा. जगन्नाथ लडकत यांनी याबाबत आदर्श घालून दिला आहे, असे महापौर अभिषेक कळमकर रविवारी म्हणाले.

पुण्याचे निवृत्त बँक अधिकारी लडकत यांनी दक्षिण भारताच्या दौऱ्यात केरळमध्ये काढलेल्या छायाचित्रांचे प्रदर्शन सावेडीतील रावसाहेब पटवर्धन सभागृहात रविवारी भरवण्यात आले. या प्रदर्शनाचे उद््घाटन करताना महापौर बोलत होते. माजी महापौर भगवान फुलसौंदर, शनैश्वर देवस्थानचे दादासाहेब दरंदले, भिंगार अर्बन बँकेचे व्यवस्थापक पांडुरंग हजारे, प्रा. माणिक विधाते आदी यावेळी उपस्थित होते.

महापौर कळमकर म्हणाले, दीर्घकाळ सेवेनंतर विश्रांती घेता लडकत यांनी छायाचित्रणाचा आपला छंद केरळमधील सहलीत जोपासला. त्यांच्यापासून इतरांनी प्रेरणा घ्यायला हवी. जगण्याचा आनंद कशात असतो, हे यातून शिकायला मिळते. हल्ली मोबाइलचा उपयोग अनेक वायफळ गोष्टींसाठी होताना दिसतो. लडकत यांनी मात्र सहलीतील स्थळे मोबाइलने टिपून ती संस्मरणीय केली आहेत.
निवृत्त बँक अधिकारी जगन्नाथ लडकत यांनी मोबाइलने काढलेल्या छायाचित्रांचे प्रदर्शन पाहताना महापौर अभिषेक कळमकर, माजी महापौर भगवान फुलसौंदर अन्य मान्यवर. छाया: अर्जुन कुलकर्णी.