आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहकार टिकवण्यासाठी आर्थिक शिस्तीची गरज : मुख्यमंत्री

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - सहकार क्षेत्राने कार्यक्षम व्यवस्थापनाबरोबरच आर्थिक शिस्त व नियम पाळण्याची गरज असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी पुण्यात केले.

महाराष्ट्र सहकारी मुद्रणालयातर्फे दिला जाणारा यावर्षीचा नरुभाऊ लिमये स्मृती आर्यभूषण पुरस्कार नगर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते अप्पासाहेब राजळे यांना, तर ज्येष्ठ संपादक विजय कुवळेकर यांना पत्रकारिता पुरस्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आला. टिळक स्मारक मंदिरात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जलसंपदामंत्री शशिकांत शिंदे होते. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, खासदार वंदना चव्हाण, महाराष्ट्र कृषी परिषदेचे उपाध्यक्ष विजय कोलते, महाराष्ट्र सहकारी मुद्रणालयाचे अध्यक्ष विजय पाटील, उपाध्यक्ष अरविंद चव्हाण, संचालक अंकुश काकडे यांनी व्यासपीठावर उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, 1991 नंतर बदलत्या आर्थिक धोरणामुळे खासगी क्षेत्राचे मोठे आव्हान उभे ठाकले. अशा परिस्थितीत कार्यक्षम व्यवस्थापनाबरोबरच कडक आर्थिक शिस्त व नियमांची काटेकोर अंमलबजावणी केल्यास सहकार क्षेत्र या बदललेल्या स्पध्रेच्या युगात स्थान भक्कमपणे टिकवू शकेल. पारदर्शक व्यवहार आणि सर्वांवर विश्वास टाकण्याची वृत्ती असल्यास सहकार क्षेत्राला समाजाकडून सहकार्य मिळेल, असे अप्पासाहेब राजळे यांनी याप्रसंगी सांगितले. वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीस 35 लाखांचा धनादेश देण्यात आला.