आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कडाक्याच्या थंडीने नगरकर गारठले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - अवकाळीपावसानंतर मागील दोन दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला आहे. तापमापकातील पारा सातत्याने घसरत असल्याने नगरकरांना हुडहुडी भरली आहे. थंडीच्या कडाक्यामुळे शहरातील बाजारपेठेतील गर्दी सायंकाळी सातलाच ओसरत आहे. पश्चिमेकडून येणाऱ्या शीत लहरीमुळे थंडीत आणखी भर पडली आहे. सोमवारी नगर शहरात १०.२ अंश सेल्सिअस इतके नीचांकी तापमान नोंदवले गेले. थंडी वाढल्यामुळे उबदार कपड्यांना मागणी वाढली आहे. नागापूर, केडगाव, िभंगारसह नगर-पुणे महामार्गावर ठिकठिकाणी उबदार कपड्यांची दुकाने थाटण्यात आली आहेत. थंडीमुळे माळीवाडा, चौपाटी कारंजा, कापडबाजार, गंज बाजार परिसरात सायंकाळी सातपासूनच शुकशुकाट असतो. शेकोट्या पेटवून नागरिक शेकताना िदसतात. वाढलेली थंडी गव्हाच्या पीकासाठी पोषक आहे. मात्र, थंडीच्या लाटेमुळे आजारांचे प्रमाण वाढले आहे. सर्दी, खोकला यांचे रुग्ण मोठ्या प्रमाणात रुग्णालयांमध्ये दाखल होत आहेत.