आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Collector Anil Kavade,Latest News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अंमलबजावणीत आत्मियता आवश्यक, जिल्हाधिकारी अनिल कवडे यांचा अधिका-यांना सल्ला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- कृषी विभागाच्या योजना राबवताना केवळ पैसा खर्च करणे आणि योजनांची अंमलबजावणी करणे, असे उद्दिष्ट न ठेवता त्यातून काय फलनिष्पत्ती झाली याचाही लेखाजोखा मांडला जावा.
योजनेच्या अंमलबजावणीत अधिका-यांची आत्मियता असेल, तर लोकांचेही सहकार्य मिळते, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत कृषी विभागाच्या योजनांचा आढावा घेताना ते बोलत होते.
या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अंकुश माने, कृषी उपसंचालक राजाराम गायकवाड, कृषी अधिकारी सुभाष कोरडे व इतर अधिकारी, सदस्य उपस्थित होते. जिल्हाधिकारी कवडे म्हणाले, जिल्ह्यात साखळी पद्धतीने सिमेंट नालाबांध बांधण्याचा कार्यक्रम, महात्मा फुले जल व भूमी संधारण अभियान, तसेच एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमाच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे केली जात आहेत. या योजनांच्या अंमलबजावणीच्या फलनिष्पत्तीचे अवलोकन व्हायला हवे.
योजना सुरू करण्यापूर्वी गावातील सिंचनाची स्थिती, योजनेच्या पूर्ततेनंतर वाढलेली पाणीपातळी, योजनेमुळे गावातील टँकरच्या संख्येत घट झाली का, जीवनमानात काही फरक पडला का, याबाबत विस्तृत माहिती गोळा केली पाहिजे. या माहितीचा उपयोग योजनेतील दूर करण्यासाठी होऊ शकतो. केवळ योजनेसाठी आलेला पैसा खर्च करणे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवणे चुकीचे आहे. माथा ते पायथा उपक्रम राबवूनही सिंचनाच्या स्थितीत फरक पडत नसेल, तर आपले काहीतरी चुकत आहे, हे लक्षात घेऊन त्यावर उपाय सुचवले पाहिजेत, असेही जिल्हाधिकारी म्हणाले. सन २०१३-१४ च्या साखळी सिमेंट नालाबांध कार्यक्रमांतर्गत ३० गावांत १०५ सिमेंटनालाबांधांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी ५ कामे पूर्ण झाली आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.