आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Collector Can't Visit School Children Issue At Nagar

साडेतीन तास ताटकळले चिमुकले, जिल्हाधिकारी मुलांकडे फिरकलेच नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- रिक्षा व व्हॅनमध्ये कशा पद्धतीने मुलांना बसवले जाते, याचे प्रात्यक्षिक रिक्षा चालक शनिवारी (18 जानेवारी) जिल्हाधिकार्‍यांना दाखवणार होते. प्रात्यक्षिकासाठी दुपारी 12 वाजल्यापासून मुले जिल्हाधिकार्‍यांच्या निवासस्थानासमोरील रिक्षात बसले होते. मात्र, साडेतीन तास ताटकळत बसूनही जिल्हाधिकारी या मुलांकडे फिरकले नाहीत.

रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत वाहतूक शाखा व उपप्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांनी सुरू केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ रिक्षा चालक संघटनेने बंद आंदोलन केले होते. याबाबत चर्चा करण्यासाठी रिक्षा चालक संघटना, वाहतूक व आरटीओ अधिकार्‍यांची जिल्हाधिकार्‍यांनी शनिवारी बैठक बोलावली होती. मात्र दुपारी 12 ची बैठक अडीच वाजता सुरू झाली. बैठकीनंतर रिक्षा चालक जिल्हाधिकार्‍यांना रिक्षात कशा पद्धतीने मुले बसवले जातात याचे प्रात्यक्षिक दाखवणार होते. जिल्हाधिकारी या मुलांजवळून गेले. मात्र, त्यांनी मुलांकडे पाहिलेही नाही.