आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘नगरनिवास’च्या फलकावर संजीवकुमारच जिल्हाधिकारी, पंधरा दिवसांनंतरही नाव बदलले नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार यांची बदली होऊन पंधरा दिवसांपेक्षा जास्त कालावधी झाला असला, तरी त्यांचे निवासस्थान व कार्यालयाबाहेर असलेल्या फलकावर अजून त्यांचेच नाव झळकते आहे.

डॉ. संजीवकुमार यांची नाशिक येथे आदिवासी विभागात बदली झाली आहे. त्यांच्या जागेवर काही दिवसांसाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रूबल अग्रवाल यांची नियुक्ती झाली होती. पण आठवडाभरातच त्यांची जळगावला जिल्हाधिकारी पदावर बदली झाली. 16 फेब्रुवारीला सकाळी दहा वाजता त्यांनी पदाची सूत्रे सोडली. त्याच रात्री सव्वाआठ वाजता पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल कवडे यांनी नगरच्या जिल्हाधिकारीपदाची सूत्रे घेतली. त्यांनी सूत्रे स्वीकारून दहा दिवस झाले, तरी ‘नगरनिवास’ समोरील, तसेच कार्यालयासमोरील फलकावर सोनेरी अक्षरात डॉ. संजीवकुमार यांचेच नाव झळकते आहे. जिल्हा प्रशासनाच्या वेबसाईटवर मात्र नवे जिल्हाधिकारी अनिल कवडे यांचे नाव आले आहे.