आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Collector Trying To Developed District Issue Nagar, Divya Marathi

शहर विकासासाठी विधायक नियोजन करू : जिल्हाधिकारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- ऐतिहासिक अहमदनगर शहराचा इतिहास अतिशय गौरवशाली आहे. या शहराला मोठा सांस्कृतिक वारसा आहे. त्यामुळे शहराचा केवळ स्थापना दिवस साजरा करून भागणार नाही, तर आता या शहराच्या विकासाकरिता व शहरातील ऐतिहासिक वास्तूंचे जतन करण्यासाठी पुढे काय विधायक करता येईल, याचे नियोजन करावे लागणार आहे. त्यासाठी लवकरच एक बैठक आयोजित केली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी बुधवारी दिली.अहमद निजामशहा यांनी 28 मे 1490 रोजी अहमदनगर शहराची स्थापना केली होती. त्यानिमित्त बुधवारी सकाळी शहराचा 524 वा स्थापना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. शहराच्या स्थापना दिनाचे औचित्त्य साधून नगर प्रेस क्लबतर्फे शहर संस्थापक अहमद निजामशहा यांच्या बागरोजा हडको येथील कबरीवर चादर चढवून अभिवादन करण्यात आले. यावेळी पोलिस अधीक्षक रावसाहेब शिंदे, महापौर संग्राम जगताप, प्रेस क्लबचे प्रभारी अध्यक्ष मन्सूर शेख आदी उपस्थित होते. त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते.
भुईकोट किल्याच्या विकासात असलेल्या तांत्रिक अडचणी लवकरच दूर होतील, अशी ग्वाही त्यांनी दिली. शहरातील ऐतिहासिक वारसा येणार्‍या पिढीला माहिती असणे काळाची गरज आहे. त्यादृष्टीने शहरातील ऐतिहासिक वास्तूंचे आधुनिकीकरण करून पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी प्रशासनातर्फे प्रयत्न केले जातील, असेही ते म्हणाले. सूत्रसंचालन उबेद शेख यांनी केले. प्रास्ताविक व स्वागत पत्रकार विजयसिंह होलम यांनी केले. इतिहासाचे अभ्यासक व ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख यांनी शहराची ऐतिहासिक माहिती दिली.