आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचे हाल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोले - गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांनाचा प्रथम प्रवेश या सूत्रामुळे अकोले तालुक्यातील इयत्ता 10वी व 12वी पास, परंतु प्रथर्मशेणीत उत्तीर्ण न झालेल्या शेकडो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. इयत्ता 11वी व महाविद्यालयाच्या प्रथम वर्ग प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना व पालकांना प्रवेशासाठी संस्थाचालकांसह प्राचार्यांचे उंबरे झिजवावे लागत आहेत. संस्थाचालक या प्रश्नात आम्ही काहीही करू शकत नाही, अशी उत्तरे देऊन सोईस्कर दुर्लक्ष करीत आहेत.

तालुक्यातील शैक्षणिक मागासलेपणाचा प्रत्यय विद्यार्थ्यांना त्रासदायक ठरत आहे. चांगल्या शिक्षणाच्या संधीची वानवा इथे असल्याने विशेष प्रावीण्यासह उच्च र्शेणीतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना भवितव्य घडवण्यासाठी तालुका सोडावा लागत आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी बाहेर पाठवण्याची ज्या पालकांची आर्थिक क्षमता नाही, त्यांनी तालुक्यातील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयांतच प्रवेश घेणे पसंत केले. तालुक्यात राजूर, अकोले व कोतूळ येथे वरिष्ठ महाविद्यालये आहेत, तर अकोले, कोतूळ, राजूर, शेंडी, ब्राrाणवाडा, लिंगदेव, निंब्रळ, पिंपळगाव नाकविंदा, गणोरे, समशेरपूर येथे कनिष्ठ महाविद्यालये आहेत. गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांचे हाल तुलनेत जास्त होत आहेत. दाखले व प्रशासकीय कागदपत्रांच्या अडचणीमुळे प्रवेशप्रक्रियेस ग्रामीण विद्यार्थ्यांना अडचणी आल्या आहेत. त्यांच्याकडून कागदपत्रांची पूर्तता होण्यापूर्वीच सतर्क पालकांनी पाल्यांचे प्रवेश निश्चित केल्याने दोन दिवसांत प्रवेशक्षमता संपली आहे. वाढीव तुकड्यांना मान्यता नसल्याने संस्थाचालक विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारत आहेत, तर प्रवेशासाठी विद्यार्थी हेलपाटे मारताना दिसत आहेत.

राजूर, कोतूळ व समशेरपूर येथील महाविद्यालयांना अनुदान नसल्याने प्रवेशासाठी 15 हजार रुपयांची मागणी केली जात आहे. ही रक्कम भरण्याची ऐपत गरीब पालकांची नाही. या संदर्भात तातडीने मार्ग शोधून प्रवेश देण्याच्या मागणीचे निवेदन भाजपच्या वतीने तहसीलदार चंद्रशेखर देशमुख यांना देण्यात आले. निवेदनावर भाजपचे जिल्हा सरचिटणीस जालिंदर वाकचौरे, धनंजय संत, नितीन जोशी, सीताराम भांगरे, दिनेश शहा, रामेश्वर मुंदडा, प्रकाश कोरडे, वाल्मिक नवले, सोमनाथ पवार, माधव ठुबे, मच्छिंद्र मंडलिक, बाळासाहेब मुळे यांच्या सह्या आहेत.

शिक्षणाधिकार्‍यांशी चर्चा करू
तालुक्यातील 10वी पास विद्यार्थ्यांना 11वी व 12वी पास विद्यार्थ्यांना प्रथम वर्षासाठी जागा र्मयादित असल्याने प्रवेश नाकारले जात आहेत, ही वस्तुस्थिती आहे. सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले पाहिजेत. त्याकरिता माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकार्‍यांसोबत व महाविद्यालयीन संस्थाचालकाशी चर्चा करून मार्ग काढू. ’’ मुश्ताक शेख, गटशिक्षणाधिकारी, अकोले.

..तर आंदोलन करणार
दुष्काळी परिस्थिती असताना विद्यापीठ फी व्यतिरिक्त कोणतीही देणगी किंवा अतिरिक्त शुल्क शिक्षणसंस्थांनी घेऊ नये. घेतल्यास ती परत करण्यासाठी भाग पाडू. कायद्याने सर्वांनाचा शिक्षणाचा हक्क असल्याने यावर सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश न दिल्यास भाजपच्या वतीने विद्यार्थ्यांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन केले जाईल.’’ जालिंदर वाकचौरे, जिल्हा सरचिटणीस, भाजप.

वाढीव तुकड्यांना मंजुरी द्यावी
अनुदानित तुकड्यांचे प्रवेश गुणवत्तेवर दिले जात आहेत. इतर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला पाहिजे. यासाठी शासनाने वाढीव तुकड्यांना मंजुरी द्यावी. मंजुरीशिवाय प्रवेश दिल्यास सरकारी यंत्रणा विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेताना मोठय़ा अडचणी निर्माण करतात. यामुळे संस्थाचालक संभ्रमात आहेत.’’ अँड. वसंतराव मनकर, उपाध्यक्ष, तालुका एज्यु. संस्था.

बारावी वाणिज्यचे 120 प्रवेश
अकोले व परिसरातून 12 वी वाणिज्यचे सुमारे 300 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मात्र, प्रथम वर्ष बी. कॉमच्या 120 जागाच मंजूर आहेत. त्यामुळे अद्याप 160 विद्यार्थी प्रथम वर्ष प्रवेशपासून वंचित आहेत. शिल्लक विद्यार्थ्यांच्या प्रवेशासंबंधी संस्था व कॉलेज काहीही निर्णय घेत नाहीत.’’ धनंजय संत, तालुकाध्यक्ष, भाजप.