आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • College Election Be Democratic, Student Requirement

महाविद्यालयीन नविडणूक व्हावी लोकशाही पद्धतीने, विद्यार्थ्यांसह संघटनांची मंत्र्यांकडे मागणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - महाविद्यालयातील विद्यार्थी प्रतिनिधींची नविड लोकशाही पद्धतीने करण्यास शासनाने २५ वर्षांपासून बंदी घातली आहे. प्रत्येक शाखेतून प्रथम येणा-या विद्यार्थ्यालाच या नविडणुकीत सहभागी होता येते. मात्र, ही नविडणूक लोकशाही पद्धतीनेच घ्यावी, अशी मागणी महाविद्यालयीन विद्यार्थी ववििध संघटनांकडून होत आहे. या मागणीबाबत विचार करण्याचे आश्वासन शिक्षणमंत्री वनिोद तावडे यांनी दिले आहे. यावर्षी होणा-या विद्यार्थी प्रतिनिधींच्या नविडणुका लोकशाही पद्धतीने झाल्यास अनेक राजकीय पक्ष संघटना या नविडणुकीत उतरतील, हे मात्र निश्चित.
राज्यातील ववििध महाविद्यालयांमध्ये सध्या विद्यार्थी प्रतिनिधींच्या नविडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. विद्यार्थ्यांमध्ये गटा-गटाने नविडणुकेची चर्चा सुरू आहे. मात्र, ही नविडणूक लोकशाही पद्धतीऐवजी गुणांच्या आधारावर होत असल्याने विद्यार्थ्यांचा उत्साह काही प्रमाणात मावळला आहे. या नविडणुकीत सर्व विद्यार्थ्यांना सहभागी होता येत नाही. केवळ हुशार विद्यार्थ्यांनाच संधी मिळते. त्यामुळे ही नविडणूक लोकशाही पद्धतीने घेण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांसह ववििध संघटनांकडून होत आहे.

राज्यात १९९१ पासून ही नविडणूक लोकशाही पद्धतीने घेण्यावर बंदी घालण्यात आली आहे. यंदा मात्र ही नविडणूक लोकशाही पद्धतीनेच घ्यावी, अशी मागणी विद्यार्थी संघटनांनी लावून धरली आहे. शिक्षणमंत्री तावडे यांनी स्वत: ही मागणी विचारात घेतली आहे. त्यासाठी त्यांनी सर्व विद्यार्थी संघटनांची बैठकही घेतली. संघटनांचे म्हणणे, तसेच विद्यापीठाचे नियम आदी बाबी पडताळून महाविद्यालयातील नविडणुका लोकशाही पद्धतीने घेण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासनही त्यांनी दिले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
या नविडणुका लोकशाही पद्धतीने झाल्या, तर त्यात विद्यार्थ्यांसह अनेक राजकीय पक्ष संघटना उतरणार आहेत.

लोकशाहीपद्धत नकोच
१९९१पूर्वी झालेल्या नविडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात भांडणे, मारामा-या, ख्ून असे अनेक प्रकार घडले. पुन्हा लोकशाही पद्धत सुरू झाली, तर अनेक महाविद्यालयांमध्ये पुढा-यांचे राजकीय अड्डे तयार होतील. सध्या विद्यार्थी महाविद्यालयात वावरताना लोकशाहीची मूल्ये किती जपतात, हाच एक प्रश्न आहे. त्यामुळे शासनाने नविडणुकीवरील बंदी जैसे थे ठेवावी, अशी मागणी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सनिेट सदस्य शविाजी साबळे यांनी केली.
राजकारणातयेतील युवक-युवती
सध्यामहाविद्यालयातील प्रत्येक शाखेत प्रथम येणारा, तसेच सांस्कृतिक, क्रीडा, एनएसएस यासारख्या काही विभागांतील विद्यार्थी नविडणूक लढू शकतो. इतरांना मात्र नविडणुकीपासून वंचित राहावे लागते. शविाय या नविडणुकीत शिक्षण संस्थांचे पदाधिकारी प्राध्यापक मोठ्या प्रमाणावर हस्तक्षेप करतात. शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना अनेक अडचणी येतात. त्यामुळे आपला प्रतिनिधी लोकशाही पद्धतीने नविडला, तर तो आपल्या समस्यांना योग्य वाचा फोडू शकेल, अशी विद्यार्थ्यांची भावना आहे. महाविद्यालयाच्या माध्यामतूनच विद्यार्थ्याच्या भविष्याची दिशा ठरते. महाविद्यालयीन नविडणुका लोकशाही पद्धतीने झाल्यास भविष्यात राजकारणात अनेक नवीन युवक-युवतींचा प्रवेश होईल. दरम्यान, विद्यापीठ प्रतिनिधींच्या नविडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांवरील ताणही वाढणार आहे.

महाविद्यालयीन नविडणुकीच्या काळात शहरात कायदा सुव्यवस्था अबाधित राखणे पोलसांच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे. सध्या नगर शहरातील अनेक महाविद्यालयांमध्ये विघातक कृत्य करणा-या विद्यार्थ्यांच्या संघटना अप्रत्यक्षपणे कार्यरत आहेत. गेल्याच आठवड्यात नगर महाविद्यालयाच्या आवारात दोन गटांमध्ये मारामारी होऊन काहीजण जखमी झाले होते.

राजकीय पक्ष नकोत
राज्यात अनेक राजकीय पक्ष कार्यरत आहेत. महाविद्यालयात लोकशाही पद्धतीने नविडणूक घ्यायची असेल, तर ती राजकीय पक्षाविना घेणे आवश्यक आहे. राजकीय पक्ष या नविडणुकीत उतरले, तर मोठ्या प्रमाणात भांडण, तंटे होण्याची भीती आहे. लोकशाही पद्धतीनेच नविडणूक झाली पाहिजे.'' गौरवपठाडे, विद्यार्थी.

आचारसंहिता हवी
महाविद्यालयीन निवडणुका लोकशाही पद्धतीने घ्याव्यात. नविडणुकीसाठी आचारसंहिता महत्त्वाची आहे. प्रत्येक नविडणुकीला राजकीय वळण मिळते. त्यामुळे या नविडणुकांसाठीदेखील आचारसंहिता आवश्यक आहे. योग्य ती दक्षता घेऊन लोकशाही पद्धतीने नविडणूक होणे अपेक्षित आहे.'' सुमीतवर्मा, मनसे विद्यार्थी संघटना.

समस्या सुटतील
कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेशअर्ज, शिष्यवृत्ती परीक्षा फॉर्म भरताना अनेक अडचणी येतात. जर लोकशाही पद्धतीने नविडणूक घेतली, तर प्रत्येकजण योग्य प्रतिनिधी नविडून देईल. विद्यार्थ्यांचे प्रश्न लवकरत लवकर सुटावेत, यासाठी लोकशाही पद्धतीनेच नविडणूक हवी.'' अक्षयदेशपांडे, विद्यार्थी.