आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉलेज कट्ट्यांवर "फ्रेशर्स'च्या स्वागताची तयारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - कॉलेज अॅडमिशनच्या टेन्शनमधून मुक्त झालेली महाविद्यालयीन तरुणाई "फ्रेशर्स पार्टी'च्या तयारीला लागली आहेत. विद्यार्थ्यांच्या लगबगीने महाविद्यालयांचे कॅम्पस प्रफुल्लीत झाले आहेत. नवीन येणाऱ्या आपल्या ज्युनिअर्सचे स्वागत इतरांपेक्षा हटके कसे होईल, याची जोरदार चर्चा सध्या कॉलेज कट्ट्यांवर होताना दिसत आहे.

नवीन कल्पना, गेम्स यासाठी काही नेटीझन्स सोशल साईटची मदत घेतली जात आहे. काही विद्यार्थी एकमेकांचे सल्ले घेऊन तयारीला लागले आहेत. काही महाविद्यालयीन युवकांच्या व्हॉट्स अॅप ग्रूपवरही फ्रेशर पार्टीची चर्चा चालू आहे. अगदी क्लासमध्ये एन्ट्री करण्यापासून ते रिफ्रेशमेंटचा मेन्यू ठरवण्याची जबाबदारी सर्वजण मिळून पार पडत आहेत.

काही विद्यार्थी टीव्ही चॅनेलवरील कॉमेडी शोसारख्या कार्यक्रमाचा आधार घेऊन वेगवेगळ्या स्कीटची तयारी करत आहेत. अनेक विभाग कोर्सच्या स्पेशलायझेशननुसार थीम निवडून वेगवेगळ्या स्पर्धा घेत आहेत. न्यू आर्टस् कॉलेजच्या मॅथ्स विभागात विषयाशी संबंधित क्वीज कॉम्पिटिशन घेऊन मिस्टर फ्रेशर, मिस फ्रेशर्सची स्पर्धा चांगलीच रंगली. वेस्ट ऑफ बेस्टच्या माध्यमातून टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू तयार करण्याची स्पर्धाही विद्यार्थ्यांनी एन्जॉय केली.
दरवर्षी नवनवीन थिम करणारे मास कम्युनिकेशन विभागाचे विद्यार्थी यंदाही वर्षी चित्रपटांसंदर्भात व्हीएफक्स, थ्रीडी तंत्रज्ञानाचा आधार घेऊन नवीन संकल्पना घेऊन येणार आहेत. अॅनिमेशन विभागाचे विद्यार्थी भारतीय संस्कृतीचे वेगवेगळे पैलू मांडणार आहेत.

मनात थोडीशी भीती, कुतुहूल घेऊन कॉलेज विश्वात पाऊल टाकणाऱ्या फ्रेशर्स विद्यार्थ्यांना यंदा अनेक नवनवीन गोष्टींची मजा घ्यायला मिळणार, हे मात्र नक्की. अभ्यासातून ब्रेक घेऊन कॉलेजचे सुरुवातीचे काही दिवस का होईना विद्यार्थी कॉलेज लाईफचा आनंद घेत आहेत.