आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाविद्यालयीन युवक जुगाराच्या विळख्यात, 'फनफेअर'च्या नावाखाली "अक्षता गार्डन'मध्ये जुगार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- स्टेशन रस्त्यावरील "अक्षता गार्डन' या मंगल कार्यालयामध्ये "फनफेअर'च्या नावाखाली चालणा-या जुगार अड्ड्यावरील कारवाईमुळे शाळकरी मुले व महाविद्यालयीन तरुणाई जुगाराच्या विळख्यात अडकल्याची धक्कादायक बाब उजेडात आली. माजी महापौरांच्या चिरंजीवासह या छाप्यात सुमारे शंभरहून अधिक शाळकरी व महाविद्यालयीन युवक जुगार खेळताना आढळले. त्यापैकी ३५ युवकांविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुणे - मुंबईसारख्या शहरातील उच्चभ्रू वर्गातील युवकांमध्ये असलेले "फनफेअरचे फॅड' नगरमध्येही रुजत असल्याचे या कारवाईमुळे स्पष्ट झाले.

अक्षता गार्डनमध्ये पुढील बाजूला डीजेच्या तालावर वाढदिवसाची पार्टी सुरू होती, तर पाठीमागील मंगल कार्यालयाच्या गार्डनमध्ये फनफेअरचे आयोजन करण्यात आले होते. फनफेअरच्या नावाखाली महाविद्यालयीन युवक तेथे जुगार खेळत असल्याची माहिती खबऱ्यामार्फत पोलिस अधीक्षक लखमी गौतम यांना मिळाली. त्यांच्या सूचनेनुसार अतिरिक्त पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, शहर विभागाचे उपअधीक्षक यादवराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पोलिस पथकाने रविवारी रात्री ८ वाजता या हॉटेलवर छापा टाकला. त्यावेळी तेथे तीन पत्ती, ७ अप ७ डाऊन, रेड अँड ब्लू, बीट द डीलर, इव्हन अँड ऑड, हेड अँड टेल नावाचे जुगार खेळले जात होते.
परीविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक प्रांजल सोनवणे, पोलिस कॉन्स्टेबल योगेश घोडके, ललित पंडित, सूरज वाबळे, रोहित येमूल, याकूब सय्यद, सम्राट गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली. सुमारे शंभर शाळकरी मुले व महाविद्यालयीन युवक जुगार खेळताना सापडले. पोलिस आल्याचे पाहून जुगार खेळणाऱ्या मुलांनी आपापल्या पालकांना बोलावून घेतले. काही वेळातच व्यापारी व शहरातील प्रतिष्ठित लोकांनी मुलांना वाचवण्यासाठी घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत अतिरिक्त फौजफाटा पाचारण करण्यात आला. तोफखाना आणि कोतवाली पोलिसही घटनास्थळी आले. रात्री उशिरापर्यंत पोलिसांची कारवाई सुरू होती.
पत्रकार बाहेर, तर पुढारी आत
पोलिसांच्या छाप्याची कुणकुण लागताच काही पत्रकार व छायाचित्रकार अक्षता गार्डनसमोर आले. पण कारवाई करणाऱ्या पोलिसांनी त्यांना प्रवेशद्वारातच रोखले. छाप्यात अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्यामुळे कारवाई झाल्यानंतर माहिती देऊ, असे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे पत्रकार व छायाचित्रकार तब्बल तीन तास हॉटेलबाहेर ताटकळले. प्रतिष्ठित पालक व पुढारी मात्र आले तसे आत जात होते. त्यामुळे त्यांच्यात आतमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे समजू शकले नाही. शहानिशा केल्यानंतर अल्पवयीन मुलांना सोडून देण्यात आले. तर इतरांना कोतवाली पोलिस ठाण्यात नेण्यात आले.
छाप्यात पकडलेले युवक
आशुतोष अवधूत देशपांडे (२४, सारसनगर, चिपाडेमळा), अवधूत भगवान फुलसौंदर (२२, फुलसौंदर मळा), निखिल सुनील चाफे (२२, कौठीची तालीम, माळीवाडा), अजिंक्य हर्षद भंडारी (२४, पूनममोती नगर), विनायक अशोक गाडळकर (२२, टिळक रस्ता), मयूर जवाहरलाल गांधी (२३, सारसनगर), प्रतीक लक्ष्मण पालवे (२२, आरतीपार्क बिल्डिंग, श्रीराम चौक), सागर रमेश बलदोटा (२०, नालेगाव), कार्तिक राजू भगत (२२, भुतकरवाडी), निखिल चंद्रकांत गाडळकर (२२, टिळक रस्ता, प्रेशरपंप शेजारी), संकेत राजेंद्र कटारिया (२१, आगरकर मळा), जयेश सुरेश खरपुडे (२०, पारगल्ली, माळीवाडा), मनोज रमेश पुजारी (२०, बुरुडगाव रस्ता, भोसले आखाडा), ओकांर राजेंद्र सैंदाणे (१९, वरवंडे गल्ली, माळीवाडा), सागर शिवाजी इंदुळकर (१९, बुरुडगाव रस्ता, भोसले आखाडा), व्हिक्टर वर्णन डिसोजा (१८, अरिहंत कॉलनी, सीताबन लॉनसमोर, मार्केटयार्ड), शुभम दिलीप काळे (१९, भोसले आखाडा, मनाबाई चाळ), अक्षय राजू कनोजिया (२०, शांतीनगर, सोलापूर रस्ता), सचिन जगन्नाथ तांदळे (१८, कानडे मळा, सारसनगर), सुधांशु बाळासाहेब खैरे (१९, खैरे कॉलनी, रेल्वे स्टेशन), सुहित किरण शेटिया (१९, पूनममोतीनगर, मार्केटयार्डमागे), वैभव शिवाजी दारकुंडे (२०, आसरा पॅलेस, गुलमोहोर रस्ता पोलिस चौकीजवळ), निखील कैलास सचदेव (१९, अप्सरा अपार्टमेंट, शिलाविहार, गुलमोहोर रस्ता), दिवेश दिनेश फिरोदिया (२०, अरिहंत कॉलनी, सीताबन लॉनसमोर), राज नरेश शहा (२०, मार्केटयार्ड मागे, नवजीवन कॉलनी), विकास संजय कानडे (२४, गोविंदपुरा, शहा कॉलनी), हितेश सुरेश लुल्ला (१९, हेरिटेज अपार्टमेंट, स्टेशन रस्ता), रोहित जवाहरलाल गांधी (२५, सारसनगर), अभय अशोक गाठे (२१, कपिलेश्वर नगर, सारसनगर), कौस्तुभ सुरेश गरुड (२१, अमोल रेजिन्सी, सावेडी), यशवंत संजय चाफे (२२, कौठीची तालीम, माळीवाडा), श्रीकांत पुरुषोत्तम चाफे (२१, कौठीची तालीम, माळीवाडा), सागर विठ्ठल गुंजाळ (२१, भवानीनगर, बुरुडगाव रस्ता), सचिन शिवाजी इंदुळकर (२२, भोसले आखाडा, बुरुडगाव रस्ता), अतुल ज्ञानेश्वर कावळे (२३, कावळे चाळ, बुरुडगाव रस्ता).