आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Coming Agitation Being Non Political, Anna Hazare Cleared

यापुढील आंदोलनही अराजकीय पद्धतीनेच,राळेगणसिद्धीच्या बैठकीत अण्णा हजारेंचे स्पष्टीकरण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पारनेर (जि. नगर) - ज्यांना जायचे असेल ते जाऊ शकतात. मात्र यापुढेही आपले आंदोलन अराजकीय पद्घतीनेच होईल, अशा शब्दांत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी रविवारी भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनाची भूमिका स्पष्ट केली. ते रविवारी राळेगणमध्ये बोलत होते.जनलोकपालसाठी अण्णांसोबत ऐतिहासिक आंदोलन उभारणारे अरविंद केजरीवाल यांनी कालांतराने आम आदमी पक्षाची स्थापना करून दिल्लीत सत्ताही मिळवली. या यशानंतर अण्णांच्या कार्यकर्त्यांनाही राजकीय पक्षांची ओढ लागली. किरण बेदी यांनी नरेंद्र मोदींचे समर्थन केले, तर मेधा पाटकर यांनी ‘आप’ला पाठिंबा दिला. माजी लष्करप्रमुख व्ही. के. सिंग यांचेही तळ्यात-मळ्यात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राळेगणसिद्धी झालेल्या बैठकीत अण्णांनी कोणाचेही नाव न घेता मतप्रदर्शन केले.
‘वर्षानुवर्षे रखडलेले लोकपाल विधेयक सरकारला मंजूर करावे लागले, हा जनशक्तीचाच विजय आहे. कोणाचेही सरकार येवो, सामाजिक दबावामुळे नाक दाबले की तोंड उघडते, याची प्रचिती वेळोवेळी आली आहे. त्यामुळे यापुढेही अराजकीय पद्धतीने आंदोलने करून समाजहिताचे कायदे करण्यास भाग पाडू,’ असे अण्णा म्हणाले.
बिहार, झारखंडचा दौरा
‘जनआंदोलनाची पुढील दिशा’ या विषयावर राळेगणच्या बैठकीत चर्चा झाली. अण्णा लवकरच बिहार, ओडिशा, झारखंडच्या दौ-यावर जाऊन जनजागृती करणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. ग्रामसभांना अधिकार, राइट टू रिजेक्ट, राइट टू रिकॉल, दप्तर दिरंगाई, कष्टकरी-कामगार तसेच शेतक-यांच्या प्रश्नावर आता आंदोलन करण्यात येणार असल्याचेही अण्णांनी सांगितले.