आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...तर स्थानिक स्वराज्य संस्थांत भाजप चितपट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राहुरी - भविष्यातील निवडणूक काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्रितपणे लढवल्यास दूर झाल्यावर भाजप मित्रपक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये चितपट होतील, असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केले.
देवळाली प्रवरा नगर पालिकेतर्फे वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या नवीन कार्यालय इमारत बीआरजीएफ, तेराव्या वित्त आयोगाच्या निधीतून विकसित केलेल्या व्यापारी संकुलाचा लोकार्पण सोहळा विखे यांच्या हस्ते रविवारी झाले. याप्रसंगी ते बोलत होते. माजी अर्थमंत्री जयंत पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे, आमदार भाऊसाहेब कांबळे, प्रसाद शुगरचे अध्यक्ष प्राजक्त तनपुरे, जगन्नाथ चव्हाण, नगराध्यक्ष ज्योती त्रिभुवन, नगरसेवक विजय भडके आदी उपस्थित हाेते.

विखे म्हणाले, स्मार्ट सिटी योजनेचा फज्जा उडाला आहे. केंद्रातील राज्यातील सरकार केवळ घोषणा करण्यात दंग असल्याचा आरोप त्यांनी केला. सरकार ही व्यवस्थाही नावालाच उरली आहे. आदिवासी समाजातील मुले कुपोषणाने दगावत आहेत. मंत्री म्हणतात मी काय करू. स्थानिक स्वराज्य संस्था कोणत्या ताब्यात आहेत, हे पाहूनच ठरवून अनुदान दिले जाते. ते लोकसंख्या आधारित असावे. वाढत्या शहरीकरणामुळे नगर परिषदेपुढे आव्हाने आहेत. ज्या ठिकाणी कर वसूल, औद्योगिक वसाहत वसुली करण्यात येते येथील परिस्थिती ठिक आहे. मात्र ज्या नव्या नगर परिषदा निर्माण झाल्या आहेत, त्यांची परिस्थिती चिंताजनक आहेत. शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी यांच्या विकासासाठी सरकार निष्क्रिय आहे. देवळाली प्रवरा शहर विकासात अनेक नेत्यांचे योगदान आहे. सुंदर काम येथे मुख्याधिकारी, कर्मचारी, नागरिकांच्या सहकार्याने सुरू आहे.
बातम्या आणखी आहेत...