आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसेतून हकालपट्टी केलेल्या नगरसेवकांना आयुक्तांची नोटीस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - महापौर निवडणुकीत पक्षादेश डावलल्या प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून हकालपट्टी केलेले नगरसेवक किशोर डागवाले, गणेश भाेसले, सुवर्णा जाधव वीणा बोज्जा यांना विभागीय आयुक्तांनी नोटिसा बजावल्या आहेत. याप्रकरणी जुलैला सुनावणी होणार आहे.

जूनला झालेल्या महापौर निवडणुकीत मनसेच्या चारही नगरसेवकांनी पक्षादेश पाळता आघाडीचे अभिषेक कळमकर यांना मतदान केले. चारही नगरसेवकांनी युतीचे उमेदवार सचिन जाधव यांना मतदान करावे, असा पक्षादेश होता. त्यामुळे विभागीय आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी येत्या जुलैला सुनावणी अाहे. युतीचे महापौरपदाचे उमेदवार जाधव यांनीही विभागीय आयुक्तांकडे अपील दाखल केले आहे. या प्रकरणी मनपा आयुक्त विजय कुलकर्णी यांना म्हणणे सादर करण्याबाबतचे आदेश देण्यात आले.

महापौर निवडणुकीत मनसे नगरसेवकांनी किंगमेकरची भूमिका बजावली. या नगरसेवकांवर कारवाई होणार का, याकडे लक्ष लागले आहे. राज ठाकरे यांच्याकडे गाऱ्हाणे मांडून नंतर आपली भूमिका जाहीर करणार असल्याचे चारही नगरसेवकांनी स्पष्ट केले होते. परंतु ठाकरे यांनी भेट नाकारल्याने त्यांच्यासमाेरील अडचणी वाढल्या आहेत.
बातम्या आणखी आहेत...