आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरसेवक सातपुते यांचा आयुक्तांच्या दालनात ठिय्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(नगरसेवक दिलीप सातपुते यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी आयुक्तांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले. )
नगर-बंदपडलेले पथदिवे सुरू करण्याच्या मागणीसाठी प्रभाग ३१ चे नगरसेवक दिलीप सातपुते यांनी प्रभारी आयुक्त विलास वालगुडे यांच्या दालनात मंगळवारी दुपारी ठिय्या आंदोलन केले. आंदोलकांनी विद्युत विभागप्रमुख बाळासाहेब सावळे यांना चांगलेच धारेवर धरले. पथदिव्यांचे काम तत्काळ सुरू करून त्याबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश वालगुडे यांनी सावळे यांना दिले.
या प्रभागातील पथदिवे मागील काही दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वारंवार मागणी करूनही पथदिव्यांचे काम सुरू करण्यात आले नाही. मागील आठवड्यात आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर हे काम सुरू करण्यात आले. परंतु ते दिखाऊ स्वरूपाचे असल्याने सातपुते यांनी नागरिकांसह महापालिका कार्यालय गाठले. सुरुवातीला उपायुक्त अजय चारठाणकर यांच्याकडे सातपुते यांनी गाऱ्हाणे मांडले. परंतु चारठाणकर यांनी त्यांना वालगुडेंकडे जाण्याचा सल्ला दिला. संतापलेले सातपुते नागरिकांनी वालगुडे यांच्या दालनातच ठिय्या मांडला. जोपर्यंत प्रभागात पथदिव्यांचे साहित्य पोहोचत नाही, तोपर्यंत उठणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतल्याने वालगुडे यांनी सावळे यांना बोलावले.

सावेडीतील सत्ताधारी नगरसेवकांच्या प्रभागात पथदिव्यांचे काम परस्पर सुरू करण्यात येते, परंतु भूषणनगर परिसरात मात्र मागणी करूनही पथदिवे सुरू होत नाहीत. वालगुडे यांनी याबाबत सावळे यांना जाब विचारला. कर्मचारी, वाहन साहित्य उपलब्ध नसल्याने कामे वेळेवर होत नसल्याचे सावळे यांनी सांगितले. त्यावर वालगुडे यांनी नवीन वाहनाचा प्रस्ताव देण्याच्या सूचना दिल्या. दोन दिवसांत भूषणनगर परिसरातील पथदिव्यांचे काम सुरू करण्याचेही त्यांनी आदेश दिले. यावेळी दीपक खैरे, विजय पठारे, पप्पू भाले, वैभव पाटील, सुनील सातपुते, वसंत शिंदे, शंकर शिरसाठ, उत्तम गवळी आदी उपस्थित होते.

केडगावमधील राज्यमार्गावरील पथदिवे सुरू करण्याच्या मागणीसाठी नगरसेवक दिलीप सातपुते यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी आयुक्तांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले.