आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खडकी शाळेचे उपक्रम ओडिशात राबवणार- आयुक्त विजय कुलांगे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- जिल्हा परिषदेच्या नगर तालुक्यातील खडकी शाळेतील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत. खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांपेक्षाही ही शाळा कित्येकपटींनी पुढे आहे. या शाळेतील उपक्रम ओरिसा राज्यातील ग्रामीण भागात राबवण्याचा प्रयत्न करू, असे ओडिशा राज्यातील संबलपूरचे मनपा आयुक्त विजय कुलांगे यांनी सांगितले.
नगर तालुक्यातील राळेगण म्हसोबा येथील रहिवासी असलेल्या कुलांगे यांनी नुकतीच खडकी शाळेला भेट दिली. यावेळी शिक्षणाधिकारी अशोक कडूस, गटशिक्षणाधिकारी अनिल शिंदे, विजय काळे, सुनील कोठुळे, अमृता कोठुळे, तुळशीराम काळे, नामदेव धामणे, नलिनी भुजबळ आदी उपस्थित होते.

शाळेतील पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचे इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व, तसेच मराठी गणित विषयातील प्रावीण्य पाहून कुलांगे आश्चर्यचकीत झाले. या शाळेतील शिक्षक सरकारी नोकर म्हणून नव्हे, तर जनतेचे सेवक म्हणून काम करत असल्याचे पाहून समाधान वाटले. या शिक्षकांचा आदर्श जिल्ह्यातील इतर शिक्षकांनीही घेतला, तर मराठी माध्यमांच्या शाळांपुढे असलेले खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या स्पर्धेचे आव्हान संपुष्टात येईल. खासगी शाळांमध्ये भौतिक सुविधा जास्त असतील, पण खरी गुणवत्ता ही जिल्हा परिषदेच्या शाळेतच आहे, हे खडकी शाळेने दाखवून दिले आहे, असे गौरवोदगार कुलांगे यांनी काढले.