आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयुक्तांवर ठेकेदार मेहेरबान... घरात पायपोसही मनपाचेच...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नागरीसमस्या दूर करण्यासाठी निधी मिळत नसल्याने नगरसेवकांना स्वत:च्या प्रभागात तोंड दाखवणे अवघड झाले आहे. असे असताना महापालिका आयुक्त विजय कुलकर्णी यांच्यावर ठेकेदार चांगलेच मेहेरबान झाले आहेत. आयुक्तांच्या वसंत टेकडी येथील निवासस्थान परिसरात एका ठेकेदाराने लाखो रुपयांची कामे कोणतीही मंजुरी कार्यारंभ आदेश नसताना केली आहेत. आयुक्तांच्या निवासस्थानात साधे पायपोसदेखील कसे मनपाच्याच पैशांतून खरेदी केले जाते, याचा भांडाफोड "दिव्य मराठी'ने यापूर्वीच केला आहे.

महापालिकेची निवडणूक होऊन वर्ष उलटले, परंतु या काळात नगरसेवकांना स्वत:च्या प्रभागात एक रुपयाचेदेखील काम करता आले नाही. आयुक्त मात्र मनपाच्या पैशांची मनमानी पध्दतीने उधळपट्टी करत आहेत. आयुक्तांना राहण्यासाठी महापालिकेने वसंत टेकडी येथे अलिशान निवासस्थान बांधले आहे. जकातीचा ठेका देताना संबंधित ठेकेदार संस्थेने आयुक्तांसाठी निवासस्थान महापालिका इमारतीमध्ये सभागृह बांधावे, अशी अट होती. त्यानुसार ठेकेदार संस्थेने निवासस्थान बांधले. परंतु आयुक्तांना केवळ निवासस्थान नको होते. त्यांना त्याठिकाणी काँक्रिटचे रस्ते, उद्यान, पेव्हींग ब्लॉक, संरक्षक भिंत हवी होती. परंतु ही कामे करण्यासाठी कोणताही प्रस्ताव तयार करण्यात आला नव्हता, निविदा काढण्यात आली नाही. मंजुरी कार्यारंभ आदेश नसताना आयुक्तांच्या निवासस्थान परिसरात लाखो रुपयांची कामे करण्यात आली. आयुक्तांवर मेहेरबान झालेल्या एका स्थानिक ठेकेदाराने स्वत:च्या पैशांतून ही कामे केली आहेत. काही नगरसेवकांना याची कुणकुण लागताच तब्बल वर्षभरानंतर या कामांचे तीन वेगवेगळे प्रस्ताव बांधकाम विभागाने तयार केले. या प्रस्तावांना आता कोणत्या हेडखाली मंजुरी घ्यायची, याबाबतची रणनिती प्रशासनाने आखली आहे. आयुक्तांच्या या चुकीच्या भूमिकेमुळे अनेक नगरसेवक आता चांगलेच संतापले आहेत.

शहरातील रस्त्यांची दुरवस्था असताना आयुक्तांच्या वसंत टेकडी येथील निवासस्थानात परिसरात काँक्रिटचे असे रस्ते तयार करण्यात आले आहेत. छाया: कल्पक हतवळणे
नगरकरांची फसवणूक

^मनपासभागृहासाठीचा निधी आयुक्तांनी चुकीच्या पध्दतीने निवासस्थानाच्या कामासाठी वापरला. त्यामुळे सभागृहाचे काम रखडले आहे. प्रत्येक सभेच्या वेळी नगरसेवकांना बसण्यासाठी भाड्याच्या खुर्च्या, टेबल आणावे लागतात. आयुक्त कशा चुकीच्या पध्दतीने काम करतात, याचे हे उत्तम उदाहरण आहे. शहरात नागरी समस्यांचा डोंगर उभा असताना स्वत:च्या निवासस्थानासाठी सुमारे ४० लाख रुपयांचा निधी वापरणे ही नगरकरांची शुध्द फसवणूक आहे.'' दीपचव्हाण, नगरसेवक.

साधी ट्यूबलाईट मिळत नाही
^एकीकडेशहरातील नागरिकांना खराब झालेली ट्यूबलाईटदेखील वेळेवर मिळत नाही, तर दुसरीकडे आयुक्तांच्या निवासस्थानावर लाखो रुपयांची उधळपट्टी सुरू आहे. निवासस्थानाबाबत आमचे दुमत नाही, पण आधी नागरिकांचे प्रश्न सोडवणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे महापालिकेचे कामकाज ज्या सभागृहात चालते, त्याचेच काम अर्धवट सोडून स्वत:च्या घरासाठी परस्पर निधी पळवणे, ही बाब आयुक्तांना शोभणरी आहे. नागरिकांनीही याचा जाब विचारला पाहिजे.'' बाळासाहेबबोराटे, नगरसेवक.