आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Compaign Toward North East : Once Again India Connect Program

ईशान्येकडील मोहीम : पुन्हा भारत जोडो अभियान

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांच्या भारत जोडो अभियानाला 25 वर्षे पूर्ण होत असल्यानिमित्त त्यांचे तेव्हाचे सहकारी 15 मार्च ते 15 एप्रिलदरम्यान हे अभियान पुन्हा राबवणार आहेत. ईशान्येकडील राज्यांत होणारे हे अभियान तेथील फुटीरतावादी चळवळीच्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक सेतू ठरेल, असा विश्वास आताच्या ‘भारत जोडो’चे समन्वयक गिरीश पद्मावार यांनी व्यक्त केला.

बाबांनी राष्‍ट्रीय एकात्मतेसाठी अभियान राबवले होते. तेव्हा पंजाबात दहशतवाद होता. आजच्या काळात उल्फा, बोडो लँड, ग्रेट नागा, ग्रेट आसाम अशा फुटीरतावादी चळवळींमुळे ईशान्येकडील राज्ये अशांत आहेत. त्यामुळे हे मैत्री अभियान राबवण्यात येणार आहे.या अभियानात 40 जण सहभागी होतील. त्यात डॉ. विकास आमटे, नॅशनल यूथ प्रोजेक्ट स्वयंसेवी संस्थेचे मुख्य एस.एन. सुब्बाराव, डॉ. अशोक बेलखोडे, भूपेंद्र मुजुमदार, संजय साळुंखे, नगरचे शशिकांत चंगेडे व गोरक्षनाथ वेताळ आदी आहेत. ईशान्य राज्यातील प्रत्येकी दोन प्रतिनिधीही त्यांच्याबरोबर राहणार आहेत.
आयटीचा फायदा
आयटी क्षेत्रामुळे ईशान्येकडील तरुण शिक्षण, नोक-यांसाठी देशात फिरत आहेत. अभिसरण होत आहे. 25 वर्षांपूर्वी तिकडे गेलो होतो. त्यातूनच मोहीम सुचली’
गिरीश पद्मावार, समन्वयक

16 एप्रिलला शांतिनिकेतन येथे समारोप
इटानगर येथून 15 मार्चला यात्रा सुरू होईल. नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा, सिक्कीम, प. बंगाल करत शांतिनिकेतन येथे ही यात्रा जाणार आहे. 16 एप्रिल रोजी एका समारंभाने तेथेच यात्रेचा समारोप होईल.