आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘स्पर्धा परीक्षांचा अभ्यास पुस्तकांबाहेर चाललाय..’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- स्पर्धा परीक्षेसाठी प्रश्‍न हे अभ्यासक्रमाच्या पुस्तकांतील येत नाही. या परीक्षेचा अभ्यासक्रम आता पुस्तकांबाहेर चालला आहे, असे प्रतिपादन जिल्हा ग्राहक न्यायालयाचे न्यायाधीश तथा सदस्य विष्णू गायकवाड यांनी शुक्रवारी केले.

गायकवाड यांची बीडहून नगर येथे जिल्हा ग्राहक न्यायालयात बदली झाल्याबद्दल त्यांचा सोनई येथील साई ग्रूपतर्फे सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नॅशनल पोस्टल एम्प्लॉईज युनियनचे सचिव संतोष यादव, रामचंद्र पवार उपस्थित होते. गायकवाड म्हणाले, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञानावरच अवलंबून राहू नये. या परीक्षेसाठी आता पुस्तकांबाहेरचा अभ्यासक्रम आला आहे. नियमित वर्तमानपत्रांचे वाचन करावे. वर्तमानपत्रे म्हणजे अत्यल्प किमतीत मिळणारा माहितीचा खजिना आहे. वर्तमानपत्रांतून संपूर्ण जगाची माहिती मिळते. त्यातून आपले सामान्यज्ञान ‘अपडेट’ होते. त्यासाठी विद्यार्थ्यांनी वर्तमानपत्रांसाठी दररोज एकतास वेळ द्यावा. यावेळी यादव यांनी विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून चांगल्या पदावर नोकरीला लागून देशाची सेवा करण्याचे आवाहन केले. यावेळी डॉ. अजित येळवंडे, सचिन शेटे, प्रसाद येळवंडे उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार सुभाष येळवंडे यांनी केले.