आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पर्धा परीक्षा देता देता घडला ‘सामान्य विज्ञाना’चा यशस्वी लेखक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतिनिधी- नगरस्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना परीक्षाभिमुख मुद्द्यांच्या स्वरूपात काढून ठेवलेल्या महत्त्वाच्या नोटस्मधून मित्रांनी आग्रहाखातर ‘सामान्य विज्ञान’ या पुस्तकाची निर्मिती झाली. या पुस्तकातील उपयुक्त माहिती आणि स्पर्धा परीक्षा, डीएड सीईटी, टीईटी या परीक्षांसाठी विज्ञान यश देणारे पुस्तक अशी अल्पावधीतच या पुस्तकाची ओळख झाली. या पुस्तकाचे लेखक चंद्रकांत गोरे हे शेवगाव येथे शिक्षक आहेत.
ते ज्यावेळी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचे. त्यावेळी (2009 पर्यंत) राज्यात स्पर्धा परीक्षेच्या तयारी करण्यासाठी विज्ञान विषयासाठी उपयुक्त असे ‘मटेरियल’ उपलब्ध नव्हते. जे उपलब्ध होते. त्यातील प्रश्न परीक्षेत येत नव्हते. त्यामुळे गोरे हे क्रमिक पुस्तकांमधून अभ्यास करताना महत्त्वाचे प्रश्न नोटस् म्हणून काढून ठेवत. त्यातून ते अभ्यास करायचे. या नोटस्चा त्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये लाभ झाला. त्यांनी काढलेल्या नोटस्चे पुस्तक काढण्याबाबत त्यांनी त्यांना गुरू मानणारे व मित्र नुकतेच यूपीएससी उत्तीर्ण झालेले आदिनाथ दगडे, डीवायएसपी ईश्वर कातकडे, डीवायएसपी स्वप्नील राठोड यांच्याशी चर्चा केली. या ग्रूपपासूनच त्यांना पुस्तक काढण्याची प्रेरणा मिळाली. फेबु्रवारी 2010 मध्ये भुवनेश्वरचे जिल्हाधिकारी विजय कुलांगे यांच्या हस्ते ‘सामान्य विज्ञान’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. 2010 नंतर सलग दोन वर्षे पीएसआय, एसटीआय या परीक्षेत 20 पैकी 18 प्रश्न या पुस्तकातील होते.
त्यामुळे हे पुस्तक स्पर्धा परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय झाले. हे पुस्तक वाचून मुंबईपासून गडचिरोलीपर्यंत स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांनी गोरे यांना हे पुस्तक उपयुक्त ठरल्याच्या प्रतिक्रिया आल्या. हे पुस्तक पुण्यातील युनिक अ‍ॅकॅडमीचे संचालक तुकाराम जाधव, मल्हार पाटील यांच्यासह लेखक देवा जाधवर यांचे सहकार्य मिळाले.
‘युनिक’च्या सहकार्यानेच हे पुस्तक राज्यभरात पोहोल्याचे गोरे यांनी सांगितले. हे पुस्तक पीएसआय एसटीआय, राज्यसेवा, जिल्हा परिषदेच्या आरोग्य सेवक, प्रज्ञाशोध या परीक्षांसाठी उपयुक्त आहे. या पुस्तकाला राज्यभरातून येणारी मागणी आणि राज्य सेवा परीक्षेचे बदललते स्वरूप लक्षात घेऊन ‘सामान्य विज्ञान भाग-2’ हे पुस्तक जानेवारी 2014 मध्ये प्रकाशित केले. गोरे यांनी लिहिलेल्या पुस्तकात विज्ञानाबद्दल उपयुक्त माहिती आहे. यातील बरेचशे प्रश्न वर्ग-2, वर्ग-3 साठी आलेले होते, हे साध्यासोप्या भाषेत असणारे पुस्तक खरेच उपयोगी आहे, अशी प्रतिक्रिया नागपूर ग्रामीणचे डीवायएसी ईश्वर कातकडे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.

व्यावसायिक हेतू ठेवला नाही
बाजारातील गाईड किंवा इतर पुस्तकांकडून स्पर्धा परीक्षार्थींना क्रमिक पुस्तकांकडे वळवले. ज्याप्रमाणे दुधापासून दही, दह्याच्या मंथनातून लोणी, लोण्यापासून साजूक तुपाची निर्मिती करतो. त्याप्रमाणे या पुस्तकाची गोरे यांनी निर्मिती केली आहे. मी स्वत: वाचले आहे. प्रत्येकाने वाचावे, असे हे पुस्तक आहे. कुठलाही व्यावसायिक हेतू न ठेवता या पुस्तकाची निर्मिती केली आहे.’’ स्वप्नील राठोड, डीवायएसपी, नाशिक.

स्पर्धेतून माघार नाहीच
एसटीआयसह स्पर्धा परीक्षेच्या तीन परीक्षा दिल्या आहेत. 2003 मध्ये राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेत मानसशास्त्रात सर्वाधिक गुण मिळवले होते, तर 2007 मध्ये याच विषयाने दगा दिला. मात्र, मी माघार घेतली नाही. अभ्यास, अनुभव आणि तत्कालीक गरज म्हणून या पुस्तकाची निर्मिती झाली. हे पुस्तक वाचून विद्यार्थी यशस्वी होत आहे. यातच मला आनंद आहे. स्पर्धा परीक्षेत यश मिळाले नाही, तरी स्वत:ला सिद्ध करण्याचे अनेक पर्याय आहेत, असे गोरे म्हणाले.