आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारनियमनाला कंटाळून ऊर्जामंत्र्यांच्या विरोधात तक्रार, गुन्हा दाखल करण्याची प्रताप ढाकणेंची मागणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाथर्डी - सततच्या भारनियमनाला कंटाळून ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विरोधात पाथर्डी पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला. गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अॅड. प्रताप ढाकणे यांनी केली. ढाकणेंच्या मागणीमुळे प्रशासनाची तारांबळ उडाली. 
 
ढाकणे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले की, मी महावितरणचे नियमित वीजबिल भरतोय. त्यामुळे मला नियमित वीजपुरवठा घेण्याचा अधिकार आहे. मात्र, पूर्वसूचना देता वीजपुरवठा खंडित केला जात आहे. वारंवार होणाऱ्या खंडित वीज पुरवठ्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. महावितरणला तक्रार करूनही दखल घेतली जात नाही. भारनियमनाच्या नावाखाली दररोज नऊ ते दहा तास वीजपुरवठा खंडित केला जात आहे. त्यामुळे नागरिकांचे जीवन विस्कळीत झाले. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर ते सांगतात की, महावितरणकडे वीज तयार करण्यासाठी कोळशाची टंचाई भासत अाहे. 

केवळ महावितरणच्या गैरव्यवस्थापनामुळे ग्राहकांची चूक नसताना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या विभागाचे मंत्री म्हणून बावनकुळे हे अपयशी ठरले आहेत. पूर्ण वर्षभर राज्याला लागणारी वीज किती उपलब्ध करावी लागेल याचे नियोजन केले असते, कोळशाच्या माध्यमातून उत्पादित करावयाला लावणाऱ्या विजेला किती टन कोळसा लागतो. याचे अंदाजपत्र तयार केलेले असते, असे असतानाही कोळशाची टंचाई निर्माण कशी झाली. ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी केलेल्या दुर्लक्षाचाच परिणाम जनतेला भोगावा लागत आहे. राज्यात अतिरिक्त वीज आहे. त्यामुळे आपण इतर राज्यांना वीज पुरवठा वितरित करू शकतो, असे वक्तव्य ऊर्जामंत्र्यांनी केले होते. मग विजेचा तुटवडा का भासत आहे. यातून ग्राहकांची फसवणूक होत असून बावनकुळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी तक्रार अर्जाद्वारे केली. निवेदन देताना नगरसेवक बंडू बोरुडे, महेश बोरुडे, चांद मणियार, सिद्धेश ढाकणे, बाजार समिती संचालक वैभव दहिफळे, दिगंबर गाडे, सोमनाथ टेके, सीताराम बोरुडे, देवा पवार,पप्पू शिरसाठ, योगेश रासने, सागर इधाटे, रोहित पुंड, वैभव देवढे आदी उपस्थित होते. 
 
गुन्हा दाखल झाल्यास न्यायालयात जाऊ 
अॅड.प्रताप ढाकणे यांच्या मागणीने पोलिस बुचकाळ्यात पडले होते. निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांनी वरिष्ठांशी चर्चा करून आठ दिवसांत निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले, तर ढाकणे म्हणाले, ग्राहक संरक्षण कायद्यानुसार आठ दिवसांत गुन्हा दाखल झाल्यास आपण न्यायालयात दाद मागणार आहोत. 

 
बातम्या आणखी आहेत...