आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अपेक्षा पूर्ण करण्याचे सरकारसमोर आव्हान, 'स्वाभिमानी'चे खासदार राजू शेट्टींचे प्रतिपादन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सदाभाऊ खोत, खासदार दिलीप गांधी, माजी मंत्री बबनराव पाचपुते, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी आमदार चंद्रशेखर कदम, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुवेंद्र गांधी, मधुसूदन मुळे, सुनील रामदासी आदी यावेळी उपस्थित होते. )
नगर- शेतकरी,शेतमजूर, नोकरदार यांनी भारतीय जनता पक्षावर मोठा विश्वास टाकून सत्ता परिवर्तन घडवले. केंद्र राज्यातील सरकारकडून जनतेच्या मोठ्या अपेक्षा आहेत. त्या पूर्ण करणे हे मोठे आव्हान असून, त्याचा सरकारने गांभीर्याने विचार करावा, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले.
केंद्रातील भाजप सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात आयोजित जनकल्याण पर्व आनंदोत्सवातील चर्चासत्रात शेट्टी बोलत होते. "स्वाभिमानी'चे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत, खासदार दिलीप गांधी, माजी मंत्री बबनराव पाचपुते, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी आमदार चंद्रशेखर कदम, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुवेंद्र गांधी, मधुसूदन मुळे, सुनील रामदासी आदी यावेळी उपस्थित होते.
शेट्टी म्हणाले, गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे राज्यात महायुतीची निर्मिती झाली. आजच्या आनंद सोहळ्यास ते हवे होते. या महायुतीचा परिणाम आज संपूर्ण महाराष्ट्रात दिसत आहे. राज्यात आतापर्यंत काँग्रेसच्या विरोधात अनेक लाटा आल्या. मात्र, आता आलेली ही लाट काँग्रेसला भुईसपाट करणारी त्सुनामी होती. अटलबिहारी वाजपेयींनंतर पक्षाकडे एकही लोकनेता राहिला नव्हता. ती पोकळी नरेंद्र मोदी यांनी भरून काढली आहे. शेतकरी, शेतमजूर नोकरदार यांनी भाजपवर मोठा विश्वास टाकून सत्ता परिवर्तन घडवून आणले आहे. त्यामुळे या सरकारकडून जनतेच्या मोठ्या अपेक्षा आहेत. चमत्कार एका दिवसात होत नाही. चमत्कार हळूहळू होतो.
केंद्रातील भाजप सरकारचे एक वर्ष पूर्ण होत आहे. केंद्र राज्यातील सरकारकडून जनतेच्या मोठ्या अपेक्षा आहेत. कुठल्याही सरकारचे एक वर्षात मूल्यमापन करणे चुकीचे आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या निवडणुकीत संपूर्ण भारतात राज्यात मोठे परिवर्तन घडले. चांगल्या दिवसांचे स्वप्न त्यांनी सर्वसामान्य जनतेला दाखवले आहे. ते पूर्ण करण्यास त्यांचे सरकार प्रयत्नशील आहे, असे शेट्टी म्हणाले.
नैसर्गिक आपत्तीत प्रत्येक वेळी शेतकरी भरडला जातो. त्यामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्याची जबाबदारी सरकारची आहे. देशाचे अर्थकारण हे शेतीवर अवलंबून आहे. देशाचा अर्थमंत्री हा खरा मान्सून आहे. मान्सून वेळेवर आला, तरच देशाची स्थिती बदलेल. तापमानवाढीमुळे हवामानात बदल होत आहेत. शेती करणे आता अवघड झाले आहे. हा बदल शेतकऱ्यांना मानवणारा नाही. अच्छे दिन येतील, म्हणून या सरकारला शेतकऱ्यांनी निवडून दिले आहे. देशातील बळीराजा सुखी झाला, तरच देश विकसित होणार आहे, असे ते म्हणाले.
खासदार गांधी म्हणाले, केंद्रात राज्यात भाजपचे सरकार आल्याने शहर जिल्ह्याचे विविध प्रश्न मार्गी लागले आहेत. भविष्यात मोठ्या योजनांच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास होईल. एस. एम. पठाण, समाजसेविका डॉ. रत्ना बल्लाळ, उद्योजक संजय बंदिष्टी यांनीही मनोगत व्यक्त केले.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, मंत्र्यांना कोंडीत पकडायचे गांधींकडूनच शिकलो...
बातम्या आणखी आहेत...