आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉम्रेड पंढरीनाथ सहाणे यांचे निधन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संगमनेर - ज्येष्ठ कामगार नेते कॉम्रेड पंढरीनाथ बाबुराव सहाणे (८७) यांचे वृध्दापकाळाने शुक्रवारी निधन झाले. 'सहाणे मास्तर' या नावाने ते परिचित होते. असंघटित तंबाखू, जर्दा कामगारांच्या मूलभूत प्रश्नांसाठी आयुष्यभर संघर्ष करणारा सामान्यांचा नेता म्हणून त्यांची आेळख होती.
पेमगिरी येथे जन्मलेल्या सहाणे यांनी एसएससीपर्यंतचे शिक्षण घेतल्यावर शिक्षकाची नोकरी केली. कम्युनिस्ट विचारांनी भारावलेल्या मास्तरांना राजापूर येथील आंदोलनात वर्षभर तुरुंगवास झाला. नंतर त्यांनी राजापूर ग्रामपंचायतीचे सेक्रेटरी म्हणून काम केले. काही दिवसातच ते तलाठी म्हणून महसूल खात्यात काम करू लागले. १९६५ मध्ये उपासमारविरोधी आंदोलन केल्याने त्यांना नोकरीतून बडतर्फ करण्यात आले. काही काळ त्यांनी राष्ट्र सेवा दलाचे काम केले. १९६८ पासून त्यांचा कामगार चळवळीशी संबंध आला. संगमनेर-अकोले जनरल कामगार युनियनची स्थापना करून सक्रिय झालेल्या मास्तरांनी तंबाखू, जर्दा युनियनची स्थापना केली. कंत्राटी कामगारांसाठी त्यांनी मोठा लढा दिला. कामगारांच्या विविध प्रश्नी अनेक लढे उभारले.