आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Confederation Of Indian Industries (CII) Training 8 Nagar Person

र्जमनीतील प्रशिक्षणासाठी आठ उद्योजकांची निवड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - ‘सीआयआय’ ही भारतीय संस्था व र्जमन सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या उद्योजकता प्रशिक्षण उपक्रमासाठी देशभरातून 40 उद्योजकांची निवड झाली आहे. त्यामध्ये नगरच्या आठजणांचा समावेश आहे. या आठही उद्योजकांचा नुकताच अहमदनगर ऑटो इंजिनिअरिंग असोसिएशनच्या वतीने सत्कार करण्यात आला.

हे सर्व उद्योजक र्जमनीत महिनाभर राहून तेथील उद्योजकता विकासाचा अभ्यास करणार आहेत. अहमदनगर ऑटो इंजिनिअरिंग असोसिएशनतर्फे (क्लस्टर) नुकताच या सर्वांना निरोप देण्यात आला. र्जमनीतील विविध उद्योगांना भेटी, तेथील व्यवस्थापन, अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा अभ्यास, औद्योगिक विकासाची वाढ आदी विषयांच्या प्रशिक्षणासाठी या उद्योजकांची निवड करण्यात आली आहे.

यामध्ये नगरमधील ‘क्लस्टर’चे संचालक चिन्मय सुखटणकर यांच्यासह सुहास भिंगारे, अनिरुद्ध बोपर्डीकर, गौरव गंधे, प्रफुल्ला नातू, सौरभ वाखारे, राहुल बजाज व तेजस इंगळे यांचा समावेश आहे. ‘क्लस्टर’चे सदस्य अजित घैसास, कारभारी भिंगारे, राजीव गोरे, अविनाश बोपर्डीकर, सतीश साळवेकर, दौलत शिंदे, शशांक कुलकर्णी, मिलिंद कुलकर्णी, वैशाली माळवदे आदींनी त्यांना शुभेच्छा दिल्या. लवकरच हे उद्योजक परदेशात रवाना होणार आहेत.