आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आशा चौकात दोन गटांत धुमश्चक्री; दोघांना अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - सोशलमीडियावर धार्मिक भावना दुखावणारी पोस्ट टाकल्यामुळे गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास आशा चौकात दोन गटांत धुमश्चक्री झाली. तलवार लाकडी दांडक्याचा वापर करण्यात आला. एकाला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. सुदैवाने सहायक पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, कोतवालीचे पोलिस निरीक्षक सोमनाथ मालकर, भिंगार कॅम्पचे सहायक पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण त्यांच्या सहकाऱ्यांनी वेळीच घटनास्थळी धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला. याप्रकरणी पोलिसांनी परस्परविरोधी दोन फिर्यादी दाखल करून घेतल्या असून दोघांना अटक केली.
पहिली फिर्याद अकिब अन्सार शेख (वय २०, तख्ती दरवाजा, आशा चौक) याने दिली आहे. त्यात म्हटले आहे, आकाश निस्ताने, अमोल शर्मा, अजय, विजय (पूर्ण नावे माहीत नाहीत) यांच्यासह इतर १० जणांनी अकिबच्या मोबाइलवर धार्मिक भावना दुखावणारी पोस्ट टाकली. नंतर आशा चौकात येऊन आक्षेपार्ह घोषणा दिल्या. पोलिसांनी या फिर्यादीवरुन धार्मिक भावना दुखावणे, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन, दंगल, धमकावणे आदी कायदा कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे.
दुसरी फिर्याद महेश लालया बोडखे (वय २४, नांगरे गल्ली) याने दिली. तू आमच्या भावना दुखावणारी पोस्ट का टाकलीस, अशी विचारणा करत शाबीर शेख, फुरकान शबीर शेख, बोबीन शेख बोबो, मोहसीन ऊर्फ मामू कुरळे केसवाला, शहाफैजल बुऱ्हाण शेख ऊर्फ शानू पाण्यावाला, शकिल शेख, अजहर शेख, जावेद भेळवाला, मोइन शरबतवाला, मयून उमर शेख, फूरकानचा चुलत भाऊ, दस्तगीर चहावाला, शहानवाज खान, दानिश शेख, मोहंमद गफूर इतर १० ते १५ जणांनी त्याला तलवारीने लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली, असे या फिर्यादीत म्हटले आहे.

हल्ल्यात महेश बोडखे अाकाश निस्ताने हे गंभीर जखमी झाले. त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. महेश बोडखे याच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी आरोपींविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, धारदार शस्त्राने जखमी करणे, दंगल, मारहाण, शिवीगाळ दमदाटी करुन जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणे आदी कायदा कलमान्वये गुन्हा नोंदवला. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस िनरीक्षक राहुलकुमार पाटील करत आहेत. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.
बातम्या आणखी आहेत...