आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहाता: धारदार चाकूने काँग्रेस कार्यकर्त्याच्‍या पोटात वार, राजकीय वादातून खून

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राहाता- राहाता शहरानजिक असलेल्या पिंपळस गावात युवक काँग्रेसचे कार्यकर्ते अविनाश बाबासाहेब कापसे (२४) यांचा सोमवारी रात्री चाकूने वार करून खून करण्यात आला. या प्रकरणी भाजप जिल्हा सरचिटणीस नितीन गिताराम कापसे याच्यासह १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे संपूर्ण राहाता तालुक्यात खळबळ उडाली.

दरम्यान, आरोपी नितीन कापसेच्या अटकेसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी नगर-मनमाड महामार्गावर रास्ता रोको केला. सोमवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास पिंपळस ग्रामपंचायतीच्या मागे गावठाणात अविनाश कापसे याच्यावर जुन्या भांडणातून हा हल्ला झाल्याचे पोलिसांनी सांगितले. हल्लेखोरांनी धारदार चाकूने अविनाशच्या पोटात चार खाेल वार केले. शिवाय लाकडी दांडके व काठीने जबर मारहाणही केली. या हल्ल्यात अविनाशसोबत असलेले अन्य तिघे गंभीर जखमी आहेत.

या प्रकरणी सिताराम बाबासाहेब कापसे (३०, पिंपळस) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन नितीन गिताराम कापसे, ऋषिकेश नितीन कापसे, गंगुबाई सिताराम कापसे, सुरेखा नितीन कापसे, पुष्पक दत्तात्रय खापटे, राजेंद्र दगडू कदम, ज्ञानेश्वर चंद्रभान खापटे, नीलेश अंकुश पवार, प्रमोद सुधाकर गरुड, दीपक उत्तम देवकर, प्रमोद उत्तम देवकर, अंकुश कैलास निमसे (सर्व रा. पिंपळस, ता. राहाता) यांच्याविरुद्ध राहाता पोलिसांत दाखल करण्यात आला आहे.
पाच जण ताब्यात
भाजप जिल्हा सरचिटणीस नितीन कापसे यांच्यासह १२ जणांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाच आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून नितीन कापसे फरार आहे. नितीन याच्या अटकेसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी नगर-मनमाड महामार्गावर राहाता शहरात रास्ता रोको केला. मंगळवारी दिवसभर पिंपळस गावात तणाव होता. अतिरिक्त जिल्हा पोलिस प्रमुख संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी विवेक पाटील घटनास्थळी तळ ठोकून आहेत.
काँग्रेस प्रवेशाचा राग?
या हत्येमुळे राहता तालुक्यात खळबळ उडाली. अविनाश पूर्वी भाजपमध्ये सक्रिय होते. नंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याच्या कारणावरून हा खून झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, संबंधित फोटो..
बातम्या आणखी आहेत...