आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress Candidate Satyajit Tambe,latest News In Divya Marathi

सत्यजितच्या रुपाने योग्य पर्याय नगरला मिळाला : प्रा. बेडेकर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- नगरकर ज्या योग्य पर्यायाच्या शोधात होते, तो पर्याय आता सत्यजितच्या रुपाने मिळाला आहे. आजवरचे संस्कार आणि परंपरा या जोरावर सत्यजित नगरकरांची मने नक्कीच जिंकेल, असे मत प्रा. श्रीकांत बेडेकर यांनी व्यक्त केले.
काँग्रेसचे उमेदवार सत्यजित तांबे यांच्या सावेडी येथील प्रचारफेरीत प्रा. बेडेकर सहभागी झाले होते, त्यावेळी ते बोलत होते. सत्यजित हा चांगल्या परंपरेतून पुढे आला आहे. त्याच्यामागे कर्तृत्ववान नेतृत्वांचे पाठबळ आहे. विकास म्हणजे नेमके काय? विकासाची भूमिका घेऊन कशाप्रकारे काम करावे, याबाबत त्याला चांगली जाण आहे. तो शहरात उत्तम काम करेल, याची मला खात्री वाटते. त्याच्यामागे असलेले संस्कारच या शहराला आवश्यक आहे. सत्यजित हा त्याने सांगितलेल्या कामाला बांधिल राहील, याची जबाबदारी आम्ही घेतो. त्याने ज्या पद्धतीने शहरात काँग्रेसचे संघटन मजबूत करण्याच्या हेतूने गेल्या काही दिवसांत काम केले त्यातून त्याची सर्व व्यापकता दिसते. जुन्या, नव्या सर्वच कार्यकर्त्यांनी सत्यजितच्या प्रचारात सक्रियता दर्शवलेली आहे. सत्यजितने विविध पदांच्या माध्यमातून आजवर केलेले काम आम्ही बघितलेले आहे, असेही बेडेकर म्हणाले.