आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘आमदारांच्या नाकर्तेपणामुळे बेरोजगारी वाढली’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे आयोजित ‘नोकरी महोत्सवा’ला मोठा प्रतिसाद मिळाला, पण बेरोजगारी वाढल्याची खंत आहे. स्थानिक आमदार नाकर्ते ठरल्याने बेरोजगारी वाढली, अशी टीका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किरण काळे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली.

काळे म्हणाले, नोकरी महोत्सवाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्याने एका दिवसात निवड प्रक्रिया पूर्ण करणे शक्य नव्हते. 29 ते 31 ऑगस्ट व 2 ते 3 सप्टेंबर या कालावधीत राष्ट्रवादी भवनात उर्वरित प्रक्रिया होणार आहे. नोंदणीकृत उमेदवारांना मोबाइलवर संपर्क साधून बोलावण्यात येईल. नंतर उमेदवारांची यादी पक्ष कार्यालयाबाहेर लावण्यात येईल. एमआयडीसी वाढवण्याची नैतिक जबाबदारी आमदारांची होती, पण ते नाकर्ते ठरले. आम्ही उद्योगवाढीसाठी प्रयत्न करणार आहोत. उद्योजकांच्या प्रश्नांवर मंत्रालयात बैठक बोलावून मोठय़ा कंपन्या आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. शहरात सेना-भाजपची सत्ता आहे. स्थानिक पातळीवरून उद्योगवाढीसाठी प्रयत्न झाले नाहीत. आमच्या मेळाव्याला दोन मंत्री उपस्थित राहिले नाहीत, याचा वेगळा अर्थ काढू नये, असेही काळे म्हणाले.