आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress Face The Election Independently Says Manikrao Thakre

काँग्रेस स्वबळावर लढणार - माणिकराव ठाकरे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेगाव - राज्यातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढवणार किंवा नाही याचा निर्णय दिल्लीतच होईल. मात्र, कार्यकर्त्यांच्या इच्छेमुळे सांगली महापालिका आणि अकोला, वाशीम, धुळे व नंदुरबार जिल्हा परिषदांच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी येथे दिली.

संनियंत्रण समितीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटनानंतर ठाकरे पत्रकारांशी बोलत होते. केंद्र व राज्य सरकारच्या योजना गरजूंपर्यंत पोहोचण्यासाठी संनियंत्रण समितीची स्थापना केली आहे. संनियंत्रण समितीच्या पदाधिकार्‍यांनी सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवल्यास मागील निवडणुकीत गमावलेल्या जागा पक्ष पुन्हा मिळवू शकतो, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. नऊ ऑगस्ट या क्रांतीदिनापासून राज्यात राजीव गांधी विकास योजना यात्रा काढण्यात येणार असल्याचे संनियंत्रण समितीचे प्रदेशाध्यक्ष विनायकराव देशमुख यांनी सांगितले.