आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महसूलमंत्र्यांसमोर काँग्रेसमधील गटबाजीला उधाण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत शुक्रवारी सकाळी शासकिय विर्शामगृहावर झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत शहर काँग्रेसमधील गटबाजीला उधाण आले. प्रभारी शहर जिल्हाध्यक्ष ब्रिजलाल सारडा व शहराध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. दोन्ही गटांना समजवता-समजवता थोरात यांच्या नाकीनऊ आले. विवादाच्या वातावरणातच ही बैठक गुंडाळण्यात आली.

गेल्या आठवड्यापासून शहर काँगेसमधील गटबाजी अधिक स्पष्टपणे समोर येत आहे. शहर समितीच्या बैठकीत सारडा यांना पदावरून हटवण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर थोरात शुक्रवारी सकाळी शहरातील पदाधिकारी व कायकर्त्यांना सामोरे गेले. शहर जिल्हाध्यक्ष सारडा, शहराध्यक्ष भुजबळ, सुनील कांबळे, गौरव ढोणे, दीप चव्हाण, संपत म्हस्के, नगरसेवक धनंजय जाधव, बाळासाहेब पवार, संजय लोंढे, अनंत देसाई, सुनील कोतकर आदींसह मोठय़ा प्रमाणात कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते. सुरुवातीलाच भुजबळ यांनी सारडा यांच्यावर तोफ डागली. कोणालाही विश्वासात न घेता ते काम करीत असून त्यांच्यामुळे गटबाजी वाढल्याचा आरोप केला. त्यांना पदावरून हटवण्याची मागणी करतानाच स्वत:ही पद सोडण्याची तयारी भुजबळ यांनी दाखवली.

याला प्रत्युत्तर देताना सारडा यांनी भुजबळ प्रदेश कार्यकारिणीकडून येणारे आदेश दाबून ठेवतात. त्यामुळे काम करण्यात अडचण येते. भुजबळ सहकार्य करत नसल्याची तक्रार त्यांनी केली. भुजबळ व सारडा यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांत नगरसेवक व कार्यकर्तेही सहभागी झाल्याने एकच गोंधळ उडाला. काही नगरसेवकांनी शहरात चार ब्लॉक कमिट्यांची स्थापन करण्याची मागणी करत गदारोळात आणखी भर टाकली. या गोंधळात थोरात पदाधिकारी व कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन करत होते. मात्र, कोणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. जो-तो आपला मुद्दा पुढे रेटण्याचा प्रयत्न करत होता. अखेर या गदारोळातच सभा आटोपती घेऊन थोरात मार्गस्थ झाले.

गटबाजी खपवून घेणार नाही
अशा पक्षांतर्गत गटबाजीत आगामी महापालिका व छावणी मंडळ निवडणुकांना कसे सामोरे जाणार, असा प्रo्न उपस्थित करून थोरात यांनी गटबाजी खपवून घेणार नसल्याचे सांगितले. सर्वांना सोबत घेण्याचा सल्लाही त्यांनी सारडा यांना दिला, तर येत्या आठ दिवसांत शहरात चार ब्लॉक कमिट्या स्थापन करून टाकण्याचे आश्वासनही त्यांनी गदारोळातच दिले.