आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress Laudable Initiative A Health Check Deputy Mayor Suvarna Kotakara

काँग्रेसचा आरोग्य तपासणी उपक्रम स्तुत्य- उपमहापौर सुवर्णा कोतकर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर-हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमात वाण लुटण्याऐवजी महिलांची मोफत आरोग्य तपासणी करण्याचा शहर महिला काँग्रेसने राबवलेला उपक्रम स्तुत्य आहे, असे प्रतिपादन उपमहापौर सुवर्णा कोतकर यांनी केले. आरोग्य चांगले असेल, तरच महिला कुटुंबाची जबाबदारी सक्षमपणे पेलू शकते, असेही त्यांनी सांगितले.
शहर महिला काँग्रेसच्या हळदी-कुंकू कार्यक्रमात त्या बोलत होत्या. याप्रसंगी डॉ. संजीवनी पानसंबळ, डॉ. जयर्शी म्हस्के, डॉ. सविता दरंदले, डॉ. ज्योती तनपुरे, डॉ. संगीता खंडागळे आदींनी महिलांची आरोग्य तपासणी केली. कोतकर म्हणाल्या, कुटुंबातील प्रापंचिक जबाबदार्‍या पेलताना महिलांचे स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे महिलांनी सर्व जबाबदार्‍या पार पाडताना आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. राज्य शासनाने सुरू केलेल्या अन्न सुरक्षा व राजीव गांधी जीवनदायी योजना नागरिकांच्या भल्यासाठी आहेत. या योजनांचा लाभ घेण्यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा.
महिलांना केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा लाभ मिळावा, यासाठी शहर महिला काँग्रेस प्रयत्न करत असल्याचे हळदी-कुंकू कार्यक्रमाच्या आयोजक मोरे यांनी सांगितले. यावेळी मुन्नाशेठ चमडेवाला, श्याम वाघस्कर, माजी नगरसेवक निखिल वारे, दीपक धेंड, माजी नगरसेविका मोहिनी लोंढे, नगरसेवक मुदस्सर शेख आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नलिनी गायकवाड यांनी केले. मोरे यांनी आभार मानले. महिलांची उपस्थिती मोठी होती.