आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीगोंद्यात दोन्ही काँग्रेसची आघाडी; नागवडे-जगताप करणार एकत्र प्रचार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिवाजीराव नागवडे - Divya Marathi
शिवाजीराव नागवडे
श्रीगोंदे - जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडी झाली असून, दोन्ही ठिकाणी त्यांनी प्रत्येकी निम्म्या जागा वाटून घेतल्या आहेत. 

श्रीगोंदे तालुक्यात जिल्हा परिषदेच्या सहा जागा आहेत. त्यापैकी बेलवंडी, काष्टी आढळगाव गट काँग्रेसकडे आले आहेत, तर कोळगाव, मांडवगण येळपणे गट राष्ट्रवादी काँग्रेसकडे आले. काँग्रेस राष्ट्रवादीचे स्थानिक सर्वेसर्वा अनुक्रमे शिवाजीराव नागवडे कुंडलीकराव जगताप यांच्यात हा निर्णय झाला. जिल्हा किंवा प्रदेश पातळीवर काँग्रेस राष्ट्रवादीत काही ही घडले, तरी तालुक्यात मात्र आघाडी कायम ठेवायची. निकालानंतर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदासाठी ज्याने त्याने पक्षादेशा नुसार वागायचे असे या दोन्ही नेत्यांमध्ये ठरल्याची माहिती नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिली. 

जिल्हा परिषदेप्रमाणेच पंचायत समिती गणदेखील आपसात वाटून घेतले गेले. त्यानुसार जिल्हा परिषद गट ज्या पक्षाकडे असेल त्या गटातील गणदेखील संबंधित पक्षाच्या वाट्याला जाईल. या हिशेबाने काँग्रेस पक्षाकडे पंचायत समितीचे काष्टी, लिंपणगाव, बेलवंडी, हंगेवाडी आढळगाव पेडगाव हे सहा गण जातील, तर राष्ट्रवादीकडे देवदैठण, येळपणे, कोळगाव, पारगाव, मांडवगण भानगाव हे सहा गण असतील. निकालानंतर पंचायत समितीचे सभापतिपद उपसभापतिपद आलटून पालटून वाटून घेण्यावरदेखील एकमत झाल्याची माहिती काँग्रेस वर्तुळातून मिळाली. 

तालुक्यात काँग्रेस राष्ट्रवादीचा संयुक्त जाहीरनामा असेल. प्रचाराची धुरा दोन्ही पक्षाचे नेते संयुक्तपणे स्वीकारतील. काँग्रेस नेते राष्ट्रवादीचा प्रचार करतील तसेच राष्ट्रवादीचे तालुक्यातील नेते देखील काँग्रेसच्या प्रचारात असतील, याबाबत उभय पक्षात एकमत झाले. दोन्ही पक्षांनी उमेदवारांची यादी निश्चित केली असून, ती ऐनवेळी जाहीर करण्यात येईल, असा दावा राजेंद्र नागवडे यांनी यावेळी बोलताना केला. 

नाहाटा पुन्हा धर्मसंकटात 
रासपचेनेते बाळासाहेब नाहाटा हे पुन्हा एकदा धर्मसंकटात सापडले. स्वतः निवडणूक लढवण्याचा शब्द त्यांना पाळावा लागेल. काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांची मदत घेऊन ते बाजार समितीचे सभापती झाले. आता या नेत्यांच्या विरोधात रासप खरोखर लढणार का, याविषयी उत्सुकता आहे. दुसरीकडे भाजपचे सदाण्णा पाचपुते यांच्याशी मैत्री अडचणीत मदतीचे जाहीर आश्वासनही त्यांना पाळावे लागेल. 

महेंद्र वाखारे स्वगृही परतले 
माजीमंत्री बबनराव पाचपुतेंचे निकटवर्तीय राष्ट्रवादीचे देवदैठण पंचायत समिती गणाचे मावळते सदस्य महेंद्र वाखारे पुन्हा एकदा स्वगृही म्हणजे राष्ट्रवादीत परतले. पाचपुते भाजपमध्ये गेल्यानंतर वाखारे त्यांच्या निकट वर्तुळात वावरत होते. अडीच वर्षे राष्ट्रवादीशी फटकून राहणारे वाखारे आता आपण राष्ट्रवादी सोडलीच नसल्याचा युक्तीवाद नेत्यांपुढे करत आहेत. राष्ट्रवादीकडे त्यांनी पत्नीसाठी उमेदवारी मागितली.