आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुरी: काँग्रेस-राष्ट्रवादीने मारली बाजी; भाजपचा पुन्हा भोपळा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राहुरी - तालुक्यात काँग्रेस राष्टवादीने बाजी मारल्याने भाजप शिवसेना भुईसपाट झाली असून भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांना जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये साधे खाते देखील उघडता आले नाही. विखेंचा बालेकिल्ला असलेल्या सात्रळ गटातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नंदा गाडे यांच्या विजयाने तीन तपानंतर येथे काँग्रेसला पराभव जिव्हारी लागला. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवाजी गाडे हे विजयी झाले, तर गेल्या अनेक वर्षांपासून वांबोरी हा पाटील यांच्या मागे असल्याचे यावेळी देखील तेथे जिल्हा परिषदेचे ज्येष्ठ सदस्य अॅड. सुभाष पाटील यांच्या पत्नी शशिकला पाटील गणात चिरंजिव उदयसिंह पाटील यांच्या विजयामुळे वांबोरीकर पाटील यांच्या पाठीशी असल्याचे सिद्ध झाले. असे असले तरी काँग्रेसच्या दोन जागा यावेळी कमी झाल्या, तर पंचायत समितीच्या सभापतिपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनिषा ओहळ यांच्या पाठीशी आरपीआय खंबीरपणे उभी राहिली. 

भाजपसाठी आमदार शिवाजी कर्डिले यांनी एकाकी झुंज दिली. बारागाव नांदूर येथे शिवाजी गाडे शिवाजी कर्डिले यांच्या शाब्दिक चकमक झाली होती. येथे काँग्रेसने प्रभाकर गाडे यांना उमेदवारी दिली होती. माजी आमदार काशिनाथ पवार यांचे चिरंजीव राष्ट्रवादीचे सत्यवान पवार यांना भाजपने उमेदवारी दिली असताना येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवाजी गाडे यांचा व्यक्तीगत संपर्क यामुळे शिवाजी गाडे विजयी झाले आहेत. माजी खासदार प्रसाद तनपुरे हे पुन्हा राष्ट्रवादीत गेल्याने जनसेवा मंडळाच्या साथीमुळे राष्ट्रवादी जिल्हा परिषदेच्या दोन जागेवर पंचायत समितीसाठी सहा जागा पदरात पाडू शकली. काँग्रेस उमेदवारांसाठी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे काँग्रेसचे युवा नेते डाॅ. सुजय विखे यांनी प्रचार सभा घेतल्या, तर राष्टवादीसाठी धनंजय मुंडे आमदार अजित पवार यांच्या प्रचार सभा झाल्या होत्या. 
बातम्या आणखी आहेत...