आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसचे आज दे धक्का आंदोलन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीच्या निषेधार्थ शहर काँग्रेसचे पदाधिकारी रविवारी (6 जुलै) सकाळी अकरा वाजता वाहनांना धक्का मारून आंदोलन करणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष ब्रिजलाल सारडा यांनी दिली.
सारडा म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या कालावधीत जीवनाश्यक वस्तूंचे भाव कमी करण्याचे खोटे आश्वासन देत ‘अच्छे दिन लायेंगे’च्या घोषणा दिली. मात्र, सत्तेत आल्यानंतर घरगुती गॅसच्या दरात वाढ करून महागाईचा धक्का दिला आहे. केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी सकाळी 11 वाजता भिंगारवाला चौक, कापडबाजार येथे वाहने ढकलत आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनात काँग्रेसचे शहर सरचिटणीस अनंत देसाई, शहर ब्लॉक अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ सहभागी होणार आहे.