आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Consultant Editor Yamaji Malakara Speech In Ahmednagar

"पंचसूत्रीचा अवलंब केल्यास देशात अर्थक्रांती'- यमाजी मालकर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीगोंदे- अबकारी आणि आयात कर वगळता प्रचलित करप्रणाली संपूर्णपणे निकालात काढणे, महसुलासाठी फक्त एका कराची म्हणजे बँक व्यवहार कराची तरतूद करणे, 500 व हजारांच्या नोटा चलनातून बाद करणे, रोखीच्या व्यवहारांवरील कर बंद करणे, विशिष्ट मर्यादेपर्यंतच रोखीच्या व्यवहारांना शासकीय मान्यता देणे अशा या पाच प्रस्तावांची अंमलबजावणी केल्यास अर्थक्रांती लवकरच देशात आल्याशिवाय राहणार नाही, असे मत "दिव्य मराठी'चे सल्लागार संपादक यमाजी मालकर यांनी व्यक्त केले.
येथील महामानव बाबा आमटे प्रबोधन व्याख्यानमालेत ते रविवारी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. खेंडके होते. प्रमुख पाहुणे म्हणून विठ्ठलराव वाडगे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने झाली. मालकर यांनी आपले विचार श्रीगोंदेकरांसमोर मनोरंजक पद्धतीने मांडले. सध्याची भ्रष्ट आणि असंवेदनशील आर्थिक व्यवस्था आणि तिचे सामान्य व्यक्तीच्या जीवनावर होणारे दुष्परिणाम त्यांनी समजावून सांगितले. कमकुवत व्यवस्थेमुळे निर्माण झालेली समांतर अर्थव्यवस्था, काळा पैसा आणि त्यातून उद्भवणारी गुन्हेगारी याचे दुष्टचक्र उलगडून देताना मालकर यांनी रोचक आकडेवारी लोकांसमोर आणली.

या प्रश्नावर जर उत्तर हवे असेल, तर ज्या अर्थक्रांतीची देशाला गरज आहे तिचे स्वरूप कसे असेल, तिचा उगम कसा झाला, अर्थक्रांतीचे उद्गाते बोकील यांच्या या विचारापर्यंतचा प्रवास कसा झाला, या आणि अशा अनेक गोष्टी उलगडून सांगताना मालकर यांनी जनतेला स्वतःच्या जबाबदारीचीदेखील जाणीव करून दिली. अर्थक्रांतीचा प्रस्ताव बोकील यांनी पंतप्रधान मोदी, लालकृष्ण अडवाणी, चंद्राबाबू नायडू यांच्यासह अनेकांसमोर मांडला असल्याचे मालकरांनी सांगितले. व्याख्यानास नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.