आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Contaminated Water In District Council Headquarters

झेडपीतील पाण्याच्या टाक्या अस्वच्छ, आरोग्‍य धोक्‍यात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- जिल्हा परिषद मुख्यालयातील पाण्याच्या टाक्यांमध्ये घाण साचल्याने कर्मचा-यांचे आरोग्य धोक्यात आले. संपूर्ण जिल्ह्याला स्वच्छ पाणी मिळावे, यासाठी उपाययोजना करणा-या यंत्रणेतील कर्मचा-यांनाच सध्या दूषित पाणी प्यावे लागत आहे.
इमारतीवरील टाक्यांमधील पाणी सर्व विभागांत पुरवले जाते. "दिव्य मराठी टीम'ने बुधवारी या टाक्यांची पाहणी केली, त्यावेळी त्यात घाण आढळून आली. जिल्हा परिषदेत स्वच्छतेसाठी ठेकेदार नेमण्यात आले आहेत. त्यावर जि. प. बांधकाम (दक्षिण) विभागाचे नियंत्रण आहे. कार्यालयात दररोज स्वच्छता होते, परंतु आरोग्याशी निगडीत असलेल्या पाण्याकडे मात्र दुर्लक्ष होत अाहे. उपअभियंत्यामार्फत दरमहा स्वच्छतेची पाहणी करून त्याचा रिपोर्ट बांधकाम विभागाला सादर केला जातो. असे असतानाही टाक्यांमध्ये घाण आढळून आल्याने स्वच्छतेच्या अहवालाबाबतच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पाण्याच्या टाक्यांमध्ये घाण नाही तर रेती आहे. तरीही तातडीने या टाक्या स्वच्छ करण्याचे आदेश दिले आहेत. बाळासाहेब भोसले, कार्यकारी अभियंता (दक्षिण)