आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेंग्यूची साथ आली आटोक्यात, उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- शहरातजुलैत ५७ डेंग्यूसदृश रुग्ण आढळून आले. त्यापैकी सातजणांना डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेतल्यानंतर हे सातही रुग्ण बरे झाले आहेत. डेंग्यू रोखण्यासाठी उपाययोजना प्रभावीपणे सुरू असल्याचा दावा महापालिकेच्या आरोग्य विभागाने बुधवारी केला.

१६ ते ३१ जुलै हा पंधरवाडा डेंग्यू जागृती मोहीम म्हणून राबवण्यात आला. सर्व आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी परिचारिकांनी मनपासह ४० माध्यमिक शाळांमध्ये डेंग्यू आजाराची माहिती दिली. आरोग्य सभा घेऊन डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. माहिती पत्रके पोस्टरद्वारे केडगाव रेल्वेस्टेशन परिसरात जनजागृती करण्यात आली.

मनपाच्या आरोग्य विभागामार्फत जुलै महिन्यात ४० हजार ९९३ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात ५७ रुग्ण डेंग्यूसदृश असल्याचे आढळले. या रुग्णांच्या रक्ताचे नमुने घेऊन ते जिल्हा प्रयोगशाळेत तपासण्यात आले. त्यात सात रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. या रुग्णांनी खासगी रुग्णालयांत उपचार घेतल्यानंतर ते बरे झाले असल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे. डेंग्यूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहनही या विभागाने केले. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गृहभेटी केल्या.
रेल्वेस्टेशन परिसरात साठलेल्या पाण्यात डास, अळींचे प्रमाण आढळून आले. सावेडी भागात फ्रिज, कूलरमधील पाणी, मनिप्लॅण्टच्या बाटल्या, टेरेसवरील प्लास्टिक कुंड्यांमध्ये डास अळी आढळल्या. डासांची पैदास करण्यासाठी नागरिकांकडून अजाणतेपणी प्रोत्साहन दिले जाते, असे निदर्शनास आले. आठवड्यातील एक दिवस कोरडा पाळावा, पाण्याचे साठे पूर्ण कोरडे करावेत, पाणी झाकून ठेवावे, उघड्यावर सांडपाणी साेडू नये, असे आवाहन आरोग्य विभागाने केले.
बातम्या आणखी आहेत...