आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पन्नास हजार कोटींवर संपाची टांगती तलवार, पवार- मुंडे गटांत रस्सीखेच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- गेल्या दीड महिन्यापासून ऊसतोडणी मजुरांच्या वेगवेगळ्या संघटनांनी सुरु केलेला संप अजून सुरूच अाहे. या संपाबाबत तोडगा निघाल्यास राज्यातील विविध खाजगी सहकारी साखर कारखान्यांमधील सुमारे ५० हजार कोटींची उलाढाल ठप्प होण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, या संपाबाबत लवकरच तोडगा काढण्यात येईल, असे राज्य साखर महासंघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे यांनी "दिव्य मराठी'शी बोलताना सांगितले.

ऊस तोडणी मजुरीच्या प्रचलित दरामध्ये दुप्पट वाढ करावी, मुकादमांच्या कमिशनमध्ये दुप्पट वाढ करावी, ऊसतोडणी मजुरांना २०१४-१५ चा फरक द्यावा, डॉ. विठ्ठलराव विखे ऊसतोडणी कामगार सुरक्षा विमा योजनेची अंमलबजावणी करावी, राज्य केंद्र सरकारने मजुरांच्या कुटुंबांना त्यांच्या पाल्यांच्या विकासासाठी २०० कोटी रुपये द्यावेत, मजुरांच्या मुलांसाठी निवासी शाळा सुरु कराव्यात, मुकादमांचा २० टक्के फरक १७ टक्के कमिशन द्यावे, वाहतुकीवर कर लावू नये, कराराप्रमाणे बैलगाडीचे भाडे द्यावे, कामगारांसाठी उन्नती प्रकल्प राबवण्यात यावा, मजुरांसाठी घरकुल योजना सुरु करावी, ऊसतोडणी मजुरांच्या अड्ड्यावर स्वच्छ पाणी वीज द्यावी, मजुरांना आेळखपत्र द्यावे यासह विविध मागण्यांसाठी २६ ऑगस्टपासून ऊसतोडणी वाहतूक मुकादम कामगार युनियनचे अध्यक्ष गहिनीनाथ थोरे यांच्या नेतृत्वाखाली ऊसतोडणी मजुरांनी संप सुरु केला आहे.

मजुरांच्या दुसऱ्या संघटनेचे पदाधिकारी माजी आमदार दगडू बडे यांनी ही आंदोलनात उडी घेतल्याने संप आणखी चिघळला आहे. येत्या २२ ऑक्टोबरला दसरा आहे, तर ११ नाेव्हेंबरला दिवाळी आहे. दसऱ्यानंतर मजुरांची साखर कारखान्यांकडे जाण्यासाठी तयारी सुरु होणार आहे. दिवाळीचा सण होताच दुसऱ्या दिवशी मजूर ऊस तोडणीसाठी कारखान्यांकडे रवाना होतात.
राज्यातील बीड, पाटोदा, शिरुर, कडा, आष्टी, नगर, जालना, परभणी, आैरंगाबाद, जळगाव, चाळीसगाव, वाशिम, भुसावळ या भागात १२ लाखांहून अधिक ऊस तोडणी मजूर आहे. गळीत हंगामासाठी हे मजूर प्रामुख्याने नगर जिल्ह्यातील संगमनेर, कोपरगाव, राहाता, राहुरीसह राज्यातील कोल्हापूर, सातारा, फलटण, सांगली, कराड, नाशिक, पुणे, बारामती येथे ऊस तोडणीसाठी जातात. यंदा मात्र गळीत हंगाम सुरु होण्यापूर्वीच ऊसतोड मजुरांनी संप सुरु केला आहे. खाजगी सहकारी साखर कारखान्यांमधील ५० हजार कोटींच्या उलाढालीवर या संपाची टांगती तलवार आहे. संपाबाबत तोडगा निघाल्यास १०० लाख टन साखरेच्या निर्मितीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे.

सध्या राज्यातील काही खाजगी सहकारी साखर कारखान्यांनी गळीत हंगामाची तयारी सुरु केली आहे. काही साखर कारखाने या आठवड्यात सुरु होणार आहेत. जे कारखाने सुरु झाले आहेत, तेथे मजूर जात आहेत.

मजुरांच्या संघटनांचे नेते संप सुरु ठेवणार असल्याचा दावा करत असताना मजूर मात्र साखर कारखान्यांकडे जावे की नाही, अशा द्विधा मनस्थितीत आहेत. दरम्यान, संपाबाबत लवकरच तोडगा काढण्यात येईल, असे साखर महासंघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे यांनी सांगितले आहे.

तोडगा काढल्यावरच कारखान्यांना परवाने
जोपर्यंतमागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत संप सुरुच ठेवणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एप्रिल रोजी मजुरीच्या दरात वाढ करण्याचे मुकादमांना कमिशन देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, नंतर फडणवीस यांनी कार्यवाही केलेली नाही. फडणवीस यांनी साखर महासंघाशी हातमिळवणी करु नये. जे साखर कारखाने दर देणार नाहीत, त्यांना गाळपाचा तात्पुरता परवाना देऊन नये. मजुरांच्या प्रश्नावर तोडगा काढल्यावरच परवाने द्यावेत.'' गहिनीनाथथोरे, अध्यक्ष,ऊसतोडणी मजूर युनियन.

ऊसतोडणी मजुरांच्या प्रश्नावरुन माजी केंद्रीय मंत्री शरद पवार महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या गटात चांगलीच रस्सीखेच सुरु झाली आहे. ऊसतोडणी मजुरांच्या प्रश्नावर पवार यांनी लवाद स्थापन केला होता. त्यात माजी मंत्री जयंत पाटील गोपीनाथ मुंडे यांचा समावेश होता. भारतीय जनता पक्षाचे दिवंगत ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर पंकजा मुंडे यांनी हा प्रश्न हाती घेतला आहे. सध्या पवार गटाकडून गहिनीनाथ थोरे यांनी, तर मुंडे गटाकडून माजी आमदार दगडू बडे यांनी आंदोलन सुरु केले आहे. दोन्ही गटांकडून आंदोलने सुरु असतानाच ऊसतोडणी मजुरांमध्ये मात्र संभ्रमावस्था आहे.

राज्यातील एकूण सहकारी खासगी साखर कारखाने : १९९
गेल्या वर्षीचे गाळप : ९२९ लाख टन
यंदा अंदाजे गाळप : ८५० लाख टन
गेल्या वर्षीची साखर : १०४ लाख टन
यंदाचे उत्पादन : १०० लाख टन

ऊसतोड मजुरांना न्याय देण्याची भूमिका
पंधरादिवसांपूर्वी सर्व ऊसतोडणी मजुरांच्या संघटनांशी चर्चा झाली. या संपाबाबत चर्चा करण्यासाठी २० ऑक्टोबरला बैठक घेण्यात येणार आहे. सकारात्मक तोडगा निघावा, यासाठी साखर महासंघ निश्चितपणे प्रयत्न करेल. जे मजूर कारखान्यांवर गेले आहेत, त्यांनादेखील मदत दिली जाईल. सध्या साखर धंदा अडचणीत आहे. अशा परिस्थितीत आमची मजुरांना न्याय देण्याची भूमिका आहे. संपामुळे गाळपावर मात्र कुठलाही परिणाम होणार आहे.'' शिवाजीरावनागवडे, अध्यक्ष,साखर महासंघ.