आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोपीचा कोठडीत आत्महत्येचा प्रयत्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - दरोडो,तसेच महिलेचा खून केल्याच्या गुन्ह्यात पोलिस कोठडीत असलेल्या आरोपीने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार सोमवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास पारनेर पोलिस ठाण्यातील कोठडीत घडला. संजय हातण्या भोसले (वय २५, वाघुंडे, ता. पारनेर) असे आरोपीचे नाव आहे.

सुपा पोलिस ठाण्यात नोंद असलेल्या दरोड्यासह खुनाच्या गुन्ह्यात काही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यामध्ये भोसले याचाही समावेश आहे. त्याने सोमवारी रात्री कोठडीतील ब्लँकेट फाडून ते कोठडीच्या गजांना बांधून गळफास घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा प्रकार लक्षात येताच त्याला पकडून बाजूला करण्यात आले.
ही घटना समजताच पोलिस निरीक्षक दिलीप पारेकर यांनी घटनास्थळाची पाहणी केली. सुपे ठाण्याचे पोलिस नाईक अरुण एकनाथ भिंगारदिवे यांनी याप्रकरणी फिर्याद नोंदवली आहे. संजय भोसलेविरुद्ध आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास हेड कॉन्स्टेंबल नवले करत आहेत.
यापूर्वीही पोलिस कोठडीत आत्महत्या करण्याचा प्रयत्न जिल्ह्यात काही ठिकाणी झाला आहे.
बातम्या आणखी आहेत...