आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीवर अत्याचार; आरोपीला जन्मठेप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - चौदा वर्षांच्या मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी जिल्हा न्यायालयाने एकाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. राजू दादू सूर्यवंशी (४७, वडगाव शिंदे, ता. हवेली, जि. पुणे) असे आरोपीचे नाव आहे. जिल्हा न्यायाधीश आर. व्ही. सावंत-वाघुले यांनी बुधवारी दुपारी हा निकाल दिला. सरकार पक्षातर्फे अॅड. पुष्पा कापसे-गायके यांनी काम पाहिले.
आरोपी सूर्यवंशी वडगाव शिंदे येथे रहात होता. ऑक्टोबर २०१४ मध्ये तो पीडित मुलीसह तिच्या भावाला, बहिणीला घेऊन पारनेर तालुक्यातील हंगा येथे निघाला होता. म्हसणे फाटा येथे उतरल्यानंतर त्याने दारु खाण्यासाठी काही पदार्थ घेतले. एका मंदिरात थांबल्यावर सूर्यवंशीने मुलांना जवळचे पदार्थ खायला दिले. नंतर अंधाराचा गैरफायदा घेत त्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले. हा प्रकार मुलीने तिच्या मावशीला सांगितल्यानंतर सूर्यवंशी याच्याविरुद्ध हवेली पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली.

हा गुन्हा सुपा पोलिस ठाण्यात वर्ग झाल्यानंतर उपनिरीक्षक सुहास खरमाटे यांनी न्यायालयात दोषारोपपत्र पाठवले. सरकार पक्षातर्फे एकूण ११ साक्षीदार तपासण्यात आले. त्यात वैद्यकीय अधिकारी डॉ. सुप्रिया जगताप, पीडित मुलगी, तिची मावशी यांच्या साक्षींसह वैद्यकीय पुरावा प्रबळ ठरले. बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्याच्या वेगवेगळ्या कलमान्वये न्यायालयाने सूर्यवंशीला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा एकूण १० हजार रुपये आर्थिक दंडाची शिक्षा ठोठावली.