आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Convict Get Life Imprisonment In Molestation And Beating Case

विनयभंग व मारहाण करणाऱ्या आरोपीला सक्तमजुरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिचा विनयभंग केल्यानंतर, तिला मारहाण केल्याप्रकरणी दोषी ठरवून न्यायालयाने एकाला साडेतीन वर्ष सक्तमजुरी आर्थिक दंडाची शिक्षा ठोठावली. सुखदेव मेघराज महेकारकर (२४, विळद, ता. जि. नगर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. जिल्हा न्यायाधीश आर. व्ही. सावंत-वाघुले यांनी ही शिक्षा ठोठावली.

सप्टेंबर २०१४ मध्ये सुखदेवने वर्षांच्या मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून तिचे अपहरण केले. नंतर तिचा विनयभंग केला. तिने त्याला विरोध केला असता त्याने तिला मारहाण करुन जखमी केले होते. मुलीच्या वडिलांनी फिर्याद दिल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा नोंदवून सुखदेवला अटक केली. या गुन्ह्याचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. सरकार पक्षातर्फे अॅड. सतीश लगड यांनी काम पाहिले. त्यांनी एकूण आठ साक्षीदार तपासले. त्यापैकी पिडित मुलगी, तिची आई एका साक्षीदाराची साक्ष महत्वाची ठरली. त्यानुसार अपहरण, मारहाण, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा याअंतर्गत दोषी ठरवून न्यायालयाने सुखदेवला एकूण साडेतीन वर्ष सक्तमजुरी एकूण ११ हजार रुपयांचा अर्थिक दंड ठोठावला. यातील पाच हजार रुपयांची रक्कम पीडित मुलीला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.