आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पतसंस्था कर्मचारी संघटनेची नगरमध्ये निदर्शने

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - चलनातून रद्द करण्यात आलेल्या हजार पाचशेच्या नोटा स्वीकारण्याची परवानगी पतसंस्थांना नाकारण्यात आल्यामुळे तेथील कर्मचाऱ्यांच्या कामावर परिणाम होत अाहे. पतसंस्थांना हजार पाचशेच्या नोटा स्वीकारण्याची परवानगी द्यावी, या मागणीसाठी पतसंस्था कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
यावेळी अॅड. सुधीर टोकेकर, आबासाहेब गोरे, शिवाजी ननवरे, उमेश गडदे, शंकर न्यालपेल्ली, दत्ता अभंग, बापूसाहेब हजारे, कैलास मिसाळ, आय. जी. शेख, एकनाथ हेबाडे, प्रकाश खडके, गणेश क्षीरसागर, लक्ष्मण दळवी, अमोल रसाळ, शिवाजी श्रीराम, प्रवीण सावंत, देवेंद्र काला, बाबूराव सोमवंशी आदी उपस्थित होते.

जुन्या हजार पाचशेच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय झाल्यानंतर आरबीआयने राष्ट्रीयीकृत बँकांना जुन्या नोटा स्वीकारुन नवीन नोटा देण्यास परवानगी दिली. मात्र, ग्रामीण भागात जाळे असलेल्या जिल्हा बँका पतसंस्थांना परवानगी नाकारल्याने पतसंस्थांच्या कामात अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. पतसंस्थांच्या माध्यमातून छोटे उद्योजक, व्यवसाय करणारे नागरिक, शेतकरी, दुकानदार शेतमजूर व्यवहार करत असतात. मात्र, जुन्या नोटा पतसंस्थेत स्वीकारल्या जात नसल्याने व्यवहारांवर परिणाम झाला आहे.

खातेधारक पतसंस्थेत ठेवलेले पैसे काढण्यासाठी दररोज येतात. तथापि, आता शंभर, पन्नास दहा रुपयांच्या नोटा संपत आल्या आहेत. नवीन चलन उपलब्ध नसल्याने व्यवहारात अडचणी निर्माण होऊन त्याचा परिणाम कामावर झाला आहे. ग्रामीण भागातील शेतकरी पतसंस्थांचे खातेधारक असल्याने व्यवहार पूर्ववत होण्यासाठी तातडीने हजार पाचशेच्या जुन्या नोटा स्वीकारण्यास पतसंस्थांना परवानगी द्यावी, असे निवेदन उपजिल्हाधिकारी डी. एम. बोरुडे यांना देण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...