आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्याच पेपरला सापडले कॉपी बहाद्दर, बारावी परीक्षेत बाह्य उपद्रव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- बारावीच्या परीक्षेला गुरुवारी सुरुवात झाली. पहिल्याच पेपरला भरारी पथकांनी केंद्रांची कडक तपासणी केली. शहरातील एकासह चांदा येथे दोन कॉपी बहाद्दरांवर कारवाई करण्यात आली. काही केंद्रांबाहेर बाह्य उपद्रवींची संख्या मोठी असल्याने शिक्षण विभागाचा ताप वाढला. कॉपी होऊ नये, यासाठी भरारी पथके तैनात आहेत.

जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेसाठी सुमारे ६० हजार ९०५ विद्यार्थी बसले आहेत. विद्यार्थ्यांनी कॉपी करू नये, यासाठी भरारी पथकांची परीक्षा केंद्रांवर करडी नजर आहे. जिल्हा शिक्षणाधिकारी लक्ष्मण पोले, अशोक कडूस, निरंतरचे शिक्षणाधिकारी सुनंदा ठुबे यांनी विविध केंद्रांची पाहणी केली. पोले यांनी सीताराम सारडा, दादासाहेब रुपवते शाळेची पाहणी केली. त्यांना एक कॉपी बहाद्दर आढळला. नेवासे तालुक्यातील चांदे येथील केंद्रावर दोन कॉपी बहाद्दर आढळले.

तणावमुक्तीसाठी संपर्क साधा
परीक्षाकालावधीततणाव निर्माण झाल्यास त्यांना मोफत मार्गदर्शन केले जाते. त्यासाठी शिक्षण मंडळाच्या वतीने पुणे, अहमदनगर, सोलापूर विद्यार्थी पालकांच्या समुपदेशनाची व्यवस्था करण्यात आली आहे. समुपदेशनासाठी सकाळी अकरा ते सायंकाळी सहा वेळेत ९०२८०२७३५३ या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधावा.'' एस. एल. कानडे, समुपदेशक