आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोथिंबिरीची जुडी झाली 40 रुपयांना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - गेल्या काही दिवसांपासून पालेभाज्यांचे दर कडाडले आहेत. दोन आठवड्यांपूर्वी असलेल्या दरांत 5 ते 10 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नगरकरांचे बजेट कोलमडले आहे. महिनाभरापूर्वी हिरव्या मिरचीने नगरकरांचा खिसा तिखट केला होता. मिरचीने आता काही प्रमाणात दिलासा दिला असला, तरी रोजच्या आहारातील कोथिंबिरीची जुडी तब्बल 40 रुपयांना विकली जात आहे.

पालेभाज्यांची आवक मध्यंतरी मंदावली होती. त्यामुळे दर गगनाला भिडले होते. माळवे निघणे बंद झाल्यामुळे आंबटचुका, शेपू यासारख्या पालेभाज्या गायब झाल्या होत्या. पुणे-नाशिकला कोथिंबिरीच्या जुडीला साडेतीनशे रुपयांचा भाव सुरू आहे. त्यामुळे नगरचा माल तिकडे जाण्याची शक्यता आहे. बुधवारी नगरच्या बाजारात कोथिंबिरीची आवक मंदावली. आवक कमी झाल्यामुळे फ्लॉवरचे भाव 20 रुपयांनी वाढले आहेत. मेथीची जुडी 2 ते 5 रुपयांनी महागली आहे. हिरवी मिरची 15 रुपयांनी कमी झाली आहे, तर शेवगा 20 रुपयांनी वाढला आहे.