आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Corpoarter Najju Pahilwan And Other Get Police Remand

नगरसेवक नज्जू पहिलवानसह चौघांना कोठडी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - झेंडीगेट परिसरात शुक्रवारी सायंकाळी झालेल्या दंगलप्रकरणी नगरसेवक नज्जू पहिलवान याच्यासह चौघा जणांना न्यायालयाने दोन दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे. दंगलीप्रकरणी कुरेशी व सय्यद गटांकडून परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या असून 40 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. या दंगलीतील आरोपी रशीद दंडा हा मात्र, पोलिसांच्या तावडीतून पळून गेला.
मोहसीन कादीर कुरेशी (30, रा. मनपा शाळा क्र. 4 नजीक, झेंडीगेट) याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, त्यांचे चुलत काका मुजाहिर कुरेशी यांनी झेंडीगेट परिसरातील कादीर बिल्डिंग विकत घेतली होती. यामुळे वाईट वाटल्याने नगरसेवक नज्जू पहिलवान, रशीद ऊर्फ दंडा अजिज, इम्रान बशीर ऊर्फ चमेली, एजाज ऊर्फ चिंची खोजा सय्यद, खंड्या युसूफ, मोहसीन बोधा, भुज्या रशीद, रशीद दंडाचा भाऊ शहबाज, अस्लम गॅसवाला ऊर्फ मन्या फैरोज जहागीरदार, गाडी धुणारा अजमल हशू इरानी, एजाज चिंचीसोबत राहणारा काळू बॉस सत्तार मायकल, समीर नज्जू पहिलवान जहागीरदार व अनोळखी 7 इसम यांनी आपल्याला व इतर साथीदारांना तलवार, गुप्ती, लोखंडी सळ्या व लाकडी दांडक्याने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
दुसरी फिर्याद सय्यद जफर हसनमिया (42, रा. एवन टी स्टॉलशेजारी, झेंडीगेट) यांनी दिली आहे. त्यात म्हटले आहे, मुजाहिद बाबुलाल कुरेशी, अन्वर चायवाला, गयाज शब्बीर कुरेशी, सलमान रऊफ कुरेशी, मोसीन कादीर कुरेशी, साकीब आरीफ कुरेशी, झिशान रफिक कुरेशी, आरिफ कुरेशी, मुश्ताक कुरेशी, ताहेर कुरेशी व इतर 10 -12 जणांनी हातात तलवारी, सत्तूर घेऊन बुलेट-मोटारसायकलवर दगडफेक करून नुकसान केले. तसेच फिर्यादीला व साथीदारांना मारहाण करून घरात घुसून शिवीगाळ, दमदाटी केली.
मोहसीन कादीर कुरेशी, साकीन आरिफ कुरेशी, जिशान रफिक कुरेशी हे जखमी आहेत. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी नज्जू पहिलवान, मुजाहिद बाबुलाल कुरेशी, गयाज शब्बीर कुरेशी व सलमान रऊफ कुरेशी यांना अटक केली आहे. शनिवारी दुपारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले.