आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिका पुन्हा आर्थकि संकटात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - पारगमन शुल्क वसुली बंद झाल्याने महापालकिेसमोर आर्थकि संकट उभे राहिले आहे. दरमहा मिळणारे २ कोटी १७ लाखांचे उत्पन्न बंद झाल्याने कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे महापालिका कर्मचारी राज्यव्यापी आंदोलन उभारण्याच्या तयारीत आहेत. येत्या २३ व २४ ऑगस्टला कोल्हापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय अधविेशनात आंदोलनाची दिशा ठरवण्यात येणार आहे. दरम्यान, एलबीटी व मालमत्ता कर वगळता दुसरे पर्यायी उत्पन्न नसल्याने प्रशासन हवालदिल झाले आहे.

महापालिका हद्दीतून जाणाऱ्या वाहनांकडून करण्यात येणारी पारगमन शुल्क वसुली १४ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून बंद झाली आहे. पारगमन वसुलीचा ठेका सुमारे २६ कोटी रुपयांना देण्यात आला होता. त्यातून मनपाला दरमहा २ कोटी १७ लाखांचे उत्पन्न मिळत होते. ही रक्कम कर्मचाऱ्यांच्या पगारावर खर्च होत होती. आता हे उत्पन्न बंद झाल्याने पगार कसा द्यायाचा हा प्रश्न निर्माण झाला आहे.

एलबीटीच्या माध्यमातून मनपाला दरमहा सरासरी तीन कोटींचे उत्पन्न मिळते. परंतु ही रक्कम वीजबिल, पाणी योजनेची देखभाल दुरुस्ती, तसेच इतर कामांवर खर्च होते. एलबीटीनंतर मालमत्ता कर हे महापालकिेच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे. परंतु दरवर्षी जेमतेम ३० ते ३५ कोटी रुपयांचा मालमत्ता कर जमा होत असून तो ववििध वकिासकामांवर खर्च होतो.
एलबीटी रद्द करण्याबाबत शासनस्तरावर काही महनि्यांपासून हालचाली सुरू होत्या. आता एलबीटीबाबत महापालिकांनीच निर्णय घ्यावा, असे शासनाने जाहीर केले आहे. मात्र, एलबीटीही नको व जकातही नको, अशी व्यापाऱ्यांची ठाम भूमकिा असल्याने नगरसह राज्यातील सर्वच महापालिकांची अवस्था ‘इकडे आड तकिडे विहीर’ अशी झाली आहे.

मनपात सध्या २ हजार ३०० कर्मचारी असून त्यांच्या पगारावर दरमहा सुमारे साडेचार कोटी रुपये खर्च होतात. दरमहा दीड कोटी रुपयांचे वीजबिल महापालकिेला भरावे लागते. त्यामुळे जमा-खर्चाचा ताळमेळ बसवताना प्रशासनाच्या नाकीनव आले आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या ववििध योजनांच्या माध्यमातून शहरात अनेक वकिासकामे सुरू आहेत, परंतु आता या कामांच्या स्वहिश्याची रक्कम भरण्यासाठीही मनपाकडे पैसे नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारासह इतर खर्चाचे संकट मनपासमोर सध्या उभे आहे.
पर्यायी उत्पन्न शोधणार
शासनाचे आदेश असल्यामुळे पारगमन शुल्क वसुली बंद करावी लागली. त्यामुळे मनपाला दरमहा मिळणारे दोन कोटींचे उत्पन्न बंद झाले आहे. मात्र, असे असले तरी कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत होतील, याची काळजी घेण्यात येईल. त्यासाठी पर्यायी उत्पन्न शोधून त्याबाबत तातडीने कार्यवाही करू.”
संग्राम जगताप, महापौर.
जकात पुन्हा सुरू करावी
पारगमन बंद झाल्यामुळे पगार वेळेत होणार नाहीत. त्यामुळे शासनाने पुन्हा जकात सुरू करावी; अथवा कर्मचाऱ्यांना पेन्शनसह पगारावर शंभर टक्के अनुदान द्यावे, या प्रमुख मागणीसाठी आंदोलन उभारण्यात येणार आहे. कोल्हापूर येथील अधविेशनात आंदोलनाची दिशा ठरवण्यात येणार आहे.”
आनंद वायकर, सरचिटणीस, मनपा कर्मचारी संघटना