आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

15 दिवसांत पिण्याचे पाणी द्या; अन्यथा आंदोलन, नगरसेवक वाकळे यांचा आयुक्तांना इशारा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - बोल्हेगाव  उपनगरातील प्रभाग मधील नंदनवननगर गांधीनगर परिसरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. पाणी वेळेवर मिळत नसल्याने महिलांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. या भागातील पाण्याचा प्रश्न पंधरा दिवसांत सुटला नाही, तर नागरिकांसह तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नगरसेवक कुमार वाकळे यांनी बुधवारी आयुक्त घनश्याम मंगळे यांना निवेदनाद्वारे दिला. 
 
नंदनवननगर गांधीनगर भागात मागील काही वर्षांपासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. वेळोवेळी मागणी करूनही महापालिकेने लोकप्रतिनिधींनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे नागरिक महापालिकेच्या विरोधात संताप व्यक्त करत आहेत. परिसरातील काही नागरिकांनी नगरसेवक वाकळे यांच्याकडे आपली समस्या मांडली. वाकळे यांनी बुधवारी नागरिकांसह आयुक्त मंगळे यांची भेट घेतली. या भागातील पाणीप्रश्न गंभीर असून नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. येथील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी तातडीने उपाययोजना करा; अन्यथा नागरिकांसह तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा वाकळे यांनी दिला. 
 
यावेळी नगरसेवक संपत बारस्कर, अरिफ शेख, गोविंद नन्नावरे, सुमंत जाधव, बापू धाकतोडे, सुधीर दौंडे, भास्कर टेमकर, बापू सुपेकर, सुजित ठोंबरे, सुखदेव दुर्गे आदी उपस्थित होते. 
 
 
बातम्या आणखी आहेत...