आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दूषित पाण्याच्या निषेधार्थ गळनिंबमध्ये गांधीगिरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीरामपूर- तालुक्यातील गळनिंब येथे गुरुवारी सकाळी ग्रामस्थांनी गावाला अशुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असल्याच्या निषेधार्थ घाण पाण्याच्या डबक्याला हार घालून गांधीगिरी केली. पाणीपुरवठा व्यवस्थित न झाल्यास 26 मे रोजी ग्रामपंचायतीला टाळे ठोकण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला.
प्रवरा भाजीपाला सोसायटीचे संचालक सुनील पांडुरंग शिंदे अशुद्ध पाणीपुरवठ्याबाबत तक्रार करण्यासाठी ग्रामपंचायतीत गेले. तेथे शिंदे यांनी खराब व्हॉल्व्ह बदलण्याची मागणी केली. या मुद्यावरून सरपंच राजेंद्र माळी यांच्याशी त्यांची जोरदार बाचाबाची झाली. गावातील जमाव जमल्यानंतर सरपंच माळी यांनी नमते घेत दोन दिवसांत कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. मात्र, यावर ग्रामस्थांचे समाधान झाले नाही. सर्वांनी घाण पाण्याच्या डबक्याला हार घालून गांधीगिरी केली. यावेळी कैलास आयनोर, केशव कडनोर, राजेंद्र गवळी, यशवंत शिंदे, शिवाजी शिंदे, अर्जुन कोहाळे, गणेश खेमनर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.